देऊळगाव राजा : प्रतिनधी
तालुक्यामधील आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ग्राम पंचायत केंद्र चालक यांना उत्कृष्ट केंद्र चालक पुरस्काराने तलुक्यातील ५ सरकार सेवा केंद्र चालकांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल सन्मानित करण्यात आले.
या बाबत सविस्तर असे की ग्रामीण भागात आपल्या कर्तव्याची जण ठेवत शेतकाऱ्याना व विध्यार्थना लागणाऱ्या कागद पत्र वेळेवर देण्यचे काम तालुक्यातील विश्वास राऊत गिरोली खुर्द, मंगेश खरात अंभोरा, ज्ञानेश्वर मुंढे नारायनखेड, शिवणकर सिनगाव जहांगीर, विष्णू गीते रोहना या पाच केंद्र चालक यांची वर्णी लागली आहे. यावेळी गटविकास अधिकारी इंगळे, जिल्हा व्यवस्थापक बोरकर, तालुका व्यवस्थापक सुनील जाधव तसेच सिंदखेडराजा तालुका व्यवस्थापक राहुल मानतकर यांच्या हस्ते हे पारितोषिक वितरण करण्यात आले, ग्राम पंचायत मध्ये असणारे सर्व ऑनलाईन चे कामे चांगल्या प्रकारे पूर्ण केल्यामुळे व तसेच नागरिकांना लागणारे दाखले वेळेवर उपलब्द करून दिल्यामुळे व त्यांना तालुक्याच्या ठिकाणी न जाता गावात वेळेवर कामे करून गावकर्यांचा वेळेची बचत आणि आर्थिक बचत होऊन तालुक्याला जान्याचा व येण्याचा खर्च तसाच टाइम वाचावला, गावातील नागरिक सुद्धा सर्वत्र त्याची प्रशंसा करत आहेत, पंचायत समिती मध्ये त्यांचा सत्कार करून आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत ग्राम पंचायत केंद्र चालक तर्फे उत्कृष्ट केंद्र चालक पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. व्यवस्थापक सुनील जाधव हे केंद्र चालकांना आपल्या मनोगतातुन सांगितले की जे काम आज रोजी तुम्ही केले हे कौतुकास्पद आहे तसेच अजूनही सर्व केंद्र चालकांनी अश्या चांगल्या प्रकारे कामे केली तर आपल्या तालुक्याचे तसेच ग्रामपंचायतीचे नाव जिल्हाभरात नाही तर महाराष्ट्रभरात आपल्या तालुक्याचे नाव होईल, आणि आज रोजी फक्त पाच ग्रामपंचायतीचे नावे बेस्ट केंद्र चालक अवार्ड ने सन्मानित करण्यात आले परंतु येणाऱ्या काळात तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायत बेस्ट केंद्र चालक अवार्ड ने सन्मानित करण्यात आली पाहिजे अशी आपणाकडून आशा बाळगतो व बेस्ट केंद्र चालक चालक अवार्ड ने सन्मानित झालेल्यांना शुभेच्छा देण्यात आली, यावेळी उपस्थित गटविकास अधिकारी इंगळे , बोरकर, जाधव, मानतकर, तसेच तालुक्यातील सर्व ग्राम पंचायत केंद्र चालक,ग्रामसेवक,आदी जणांची उपस्थिती होती.


No comments:
Post a Comment