Friday, February 7, 2020

फिल्मी स्टाईलने खासगी प्रवाशी गाड्यांवर दरोडा ;




३५ बॅग पळवल्या, चार आरोपींना अटक, ३ फरार
पुणे नागपूर महामार्गावरील टाकरखेड भागीले येथील खडकपूर्णा नदी वरील घटना
 देऊळगावराजा :  अशरफ पटेल 
      तालुक्यातील देऊळगावमही नजीक असलेल्या खडकपूर्णा पुलाच्या सुरू असलेल्या बांधकामाचा फायदा घेत अकोल्याकडे जाणाºया खासगी प्रवाशी गाड्यांमधील तब्बल ३५ बॅगा दरोडेखोरांनी लंपास केल्याचा प्रकार आज ७ फेबु्रवारी रोजी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. दरम्यान, या प्रकरणी टाकरखेड भागीले येथील नागरीकांच्या सतर्कतेमुळे देऊळगाव राजा पोलत्रसांनी चार  आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले हे सर्व आरोपी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सतीष अर्जुन काळे (१८), धनाजी सुरेश शिंदे (१८), विकास कचरू चंदनशिव (२८) व संजय रामा काळे सर्व रा.उस्मानाबाद जिल्हा यांचा समावेश आहे.  देऊळगाव राजा शहरापासून सुमारे १४ कत्रलोमीटर अंतरावर असलेल्या खडकपूर्णा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथून जाणाºया वाहनांचा वेग कमी होता. त्याचा फायदा घेत, रस्त्यावर मोठ मोठे दगडे ठेऊन या दरोडेखोरांनी वाहनाच्या मागील बाजूस असलेल्या डिक्कीतून प्रवाशांच्या बॅगा लुटण्याचा प्रकार येथे केला. जवळपास नऊ खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनातील असा ३५ बॅग या दरोडेखोरांनी लुटल्या आहेत. दरम्यान पहाटे हा प्रकार एका खासगी बस चालकाच्या लक्षात आला. सोबतच टाकरखेड भागीले येथील काही नागरीकांनाही ही बाब समजली. त्यानंतर देऊळगाव मही पोलीस चौकीस याची माहीती देण्यात आल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळ गाठले व टाकरखेड भागीले येथील नागरीकांच्या मदतीने चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तीन जण फरार झाले आहे. मात्र या दरम्यान पोलीसानी दरोडेखोरांनी लुटलेल्या ३५ बॅग परत मिळवीण्यास यश मिळवीले आहे.
      देऊळगावराजा पोलीसात गुन्हा दाखल : 
       दरोड्यातील आरोपींविरूद्ध खाजगी बस चालक योगेश नाना पाटील रा.नंदुरबार यांच्या फिर्यादवरून पोलीसांनी अप नं.३३/२० कलम ३९५, ५०६ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला आहे. 
     नागरीकांच्या मदतीने आरोपी पोलीसांच्या तावडीत : 
      दररोज पहाटे गुड मार्नीग म्हणून वाकींग करणारे भरत देशमुख, शरद देशमुख रा.टाकरखेड, भरत शिंगणे, कृष्ण शिंगणे, अन्सार शेख रा.दे मही यांनी रस्त्यावरील दरोडेखोरांची हालचाली पाहुन टाकरखेड आणी देऊळगाव मही येथील नागरीकांना संपर्क केला. तसेच पोलीसांना सुचना देऊन आरोपींना पोलीसांच्या ताब्यात दिले. यावेळी एएसपी अशोक बुधवंत, एएसआय अकील काझी, पिएसआय उमाळे, पोका राजु मोरे, नितीन जाधव, विजय किटे, शिवानंद केदार, तुकाराम मोरे आदी अधिकारी व कर्मचाºयांनी आरोपींना अटक करण्यासाठी कामगिरी केली. सदर घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भिमानंद नलावडे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार संभाजी पाटील हे करीत आहे.
    खामगाव-अकोला परिसरातही दरोड्याचा प्रयत्न
      अटक करण्यात आलेले चौघे सराईत गुन्हेगार असून त्यांचे तीन सहकारी फरार झालेले आहेत. गेल्या दोन ते तीन दिवसापासून अकोला, खामगाव परीसरातील मार्गावर अशाच पद्धतीने त्यांनी दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला होता. त्यात एका प्रवाशाच्या बॅगमधून पैसे मिळाल्यानंतर चांगले कपडे सुद्धा या आरोपींनी खरेदी केल्याची  माहिती देऊळगाव राजाचे पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी दिली.
     दरोड्यात ट्रकचा वापर
      उस्मानाबाद जिल्ह्यातील या टोळीत एकूण सात जण आहे. दरोड्यासाठी ते ट्रकचा वापर करत होते. पुलावर वाहनांचा वेग अत्यंत कमी होतो. त्याचा फयदा घेत या दरोडेखोरांनी या सुमारे २०० मीटरच्या पट्ट्यात खासगी प्रवाशी वाहतूक करणाºया वाहनाच्या मागील डिक्कीचे कुलूप तोडत त्यातून प्रवाशांच्या बॅगा लंपास करत ट्रकमध्ये टाकून पलायन करण्याचा प्रयत्न होता. पोलिसांनी घटना स्थळावरून १२ चाकी ट्रक क्रमांक एमएच १२ के.पी. ५८७१ जप्त केला आहे. तर दुसरा ट्रक क्र.एमएच ४६ १७६१ मध्ये बसवून ३ दरोडेखोर पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. 

       

 















 


No comments:

Post a Comment