Monday, February 17, 2020

कलागुण जोपासा जगणे समृध्द होईल - कवी अजीम नवाज राही



श्री व्यंकटेश महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न 
 देऊळगावराजा : (प्रतिनिधी)  
           प्रत्येक विद्याथ्यार्ने आपल्यातील कलागुण जोपासायला हवेत. संधी मिळेल त्या ठिकाणी ते सादरही करावेत, यामुळे जगणे समृध्द होऊ शकते, असे प्रतिपादन ख्यातनाम कवी व निवेदक अजीम नवाज राही यांनी केले. स्थानिक श्री व्यंकटेश कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनाच्या समारोप समारोह प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गजानन जाधव हे उपस्थित होते.
  प्रमुख अतिथी कवी अजीम नवाज राही यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना स्वत:च्या आयुष्याचा खडतर प्रवास प्रतिकूल परिस्थितीचे सोसावे लागलेले चटके मनोगताच्या व विविध कवितांच्या माध्यमातून शब्दबध्द केले. आपल्यामध्ये असलेली कला मग ती लेखनाची असो, वादनाची असो वा संभाषणाची असो आपल्याला प्रसिध्दी मिळवून देते सोबतच आपल्या उदरनिवार्हाचे साधनही बनू शकते. यासाठी कलेप्रति एकनिष्ठ राहावे लागते असा सल्ला राहींनी मार्गदर्शनादरम्यान दिला. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने क्रीडा विभागाच्या वतीने बुद्धिबळ, क्रिकेट, कबड्डी, वेटलिफ्टींग, बॅडमिंटन यासह अनेक क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि.१४ व १५ फेब्रुवारी रोजी आयोजित या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. पहिल्या दिवशी प्रख्यात कवी केशव खटींग यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले. या दिवशी गीतगायन स्पर्धा, वेशभूषा अशा स्पर्धा आयोजित करुन विद्यार्थ्यांमधील सुप्तगुणांना वाट मोकळी करुन देण्यात आली. विद्यार्थ्यांचे मनोरंजन करणारा संगीत शेला पागोटे हा कार्यक्रमही घेण्यात आला. संमेलनाच्या दुस-या दिवशी आयोजित नृत्य स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. एकांकिका स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ह्यचला बदल घडवू याह्ण,  ह्यस्त्री-पुरुष समानताह्ण, ह्यमुलाखतह्ण या एकांकिकेसह ह्यड्रंक अ?ॅण्ड ड्राईव्हह्ण मुळे होणारे नुकसान आणि ह्यराष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारे मुकनाट्यह्ण सादर करुन अभिनयाची चुणूक दाखवली. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध पदार्थांचे प्रदर्शन अर्थात आनंद मेळावा याप्रसंगी आयोजित करण्यात आला. शाब्दिक शेला पागोटे या कार्यक्रमाने स्नेहसंमेलनात रंगत भरली. या दोन दिवसीय स्नेहसंमेलनामध्ये विविध स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणा-या विद्यार्थ्यांना अतिथी अजीम नवाज राही व प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी स्नेहसंमेलनात सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. विद्यार्थी हा शिक्षणासोबतच सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमातही अग्रेसर असायला हवा. ही गुणकौशल्ये विद्यार्थ्यांमध्ये विकसित व्हावी या दृष्टिकोनातून स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते अशी माहिती प्राचार्य डॉ. गजानन जाधव यांनी दिली. या स्नेहसंमेल समारोप समारोहाचे सूत्रसंचालन प्रा. मंजुषा मुळे यांनी केले. अतिथींचा परिचय प्रा. मंदार जोशी यांनी करुन दिला. उपस्थितांचे आभार प्रा. पवन कदम यांनी व्यक्त केले. या स्नेहसंमेलनाचा आस्वाद घेण्यासाठी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 















 


No comments:

Post a Comment