जि प सिंचन विभागात समोर शेतकºयाचे उपोषण
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
शासनाच्या जिल्हा परिषद सिंचन विभागामार्फत बांधण्यात आलेल्या पाझर तलाव क्षेत्रात खाजगी व्यक्ती कडून विहीर खोदकामा ची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी वारंवार पाठपुरावा करूनही वरिष्ठांनी कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शेतकºयाने सिंचन विभाग कार्यालयासमोर दि.१७ फेब्रूवारी रोजी उपोषणाला सुरुवात केली.
तालुक्यातील पिंपळगाव चिलमखा शिवारात गट क्रमांक १८३ व १८७ शेत क्षेत्रात शेख हरून अब्दुल रशीद यांची शेत जमीन असून त्यातील काही भाग पाजर तलाव साठी संपादित करण्यात आला होता सदर पाझर तलाव क्षेत्रात शासकीय जमिनीवर लंकाबाई सारंगधर तळेकर यांनी सन २०१८ मध्ये पाझर तलाव क्षेत्रात विहीर खोदकाम केले एक जागरूक नागरिक म्हणून सदर विहीर खोदकाम बुडीत क्षेत्र असलेल्या शासकीय जमिनीत होत असल्याची तक्रार शेख हारून यांनी जिल्हा परिषद सिंचन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय कार्यकारी अभियंता सिंचन विभाग जिल्हा परिषद बुलढाणा व उपविभागीय अधिकारी यांना देऊनही ही प्रशासनाने सदर तक्रारीची नोंद न घेता गैरअर्जदार यांच्या सोयीनुसार अहवाल सादर केला व बुडीत क्षेत्रात विहीर खोदकाम करणाºया श्रीमती तळेकर यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही प्रशासनाच्या या भूमिके विरुद्ध स्थानिक जि प सिंचन विभाग कार्यालयासमोर शेख हारून या शेतकºयाने उपोषण सुरू केले आहे सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी व गैरअर्जदार यांना पाठीशी घालणा?्या अधिकाºयांविरुद्ध योग्य ती कारवाई करावी अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे


No comments:
Post a Comment