Friday, February 21, 2020

देऊळगाव मही येथे होणाऱ्या नागरी सत्कार व भूमिपूजन सोहळ्यात उपस्थितीत रहा : कल्याणी शिंगणे


देऊळगाव राजा : प्रतिनधी     
      राज्याच्या अन्न व औषध प्रशासन मंत्री  व जिल्ह्याचे पालकमंत्री पदी ना.डॉ राजेंद्र शिंगणे व बुलढाणा जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती पदी रियाज खा पठाण यांची निवड झाली असून दोघांचा देऊळगाव मही करांच्यावतीने आज दुपारी येथील विश्रामगृह प्रागणात नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला असून या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आव्हान पंचायत समितीच्या माजी सभापती कल्याणी शिंगणे यांनी केले आहे.
        मंत्री पदी ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांची निवड झाल्यानंतर प्रथमच ते कार्यक्रमा निमित्ताने देऊळगाव मही येत आहेत. यावेळी तुकाराम महाराज शिंगणे व शेख निसार यांनी लाडू तुला च्या कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. याच बरोबर शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच कला, क्रिडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्य, उद्योग, सहित्य, सामाजीक क्षेत्रातील संघटना कार्यकर्त्यांनी डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार करण्यांची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे ना. डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या व भूमिपुत्र रियाज खा पठाण यांचा भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. ना. डॉ राजेंद्र शिंगणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले आहे. जिल्ह्याशी नाळ असणारा नेता या पदावर आल्याने रखडलेला विकास कामे मार्गी लागेल, साहेबांचीमंत्री पदी व रियाज खा पठाण यांची सभापती पदी वर्णी लागल्यानं सर्वसामान्य माणसाला मोठा आनंद झाला आहे.  या कार्यक्रमाला उपस्थितीत राहण्याचं आव्हान माजी सभापती कल्याणी शिंगणे यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment