Tuesday, February 4, 2020

जालन्यात मारहाण झालेल्या प्रेमीयुगुलाने थाटला संसार, मंदिरात केलं लग्न


मेंढगावातील मंदिरात दोघांनी केलं लग्न केल्याची माहिती आहे.
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
      जालना जिल्ह्यातील गोंदेगाव शिवारात एका प्रेमी युगुलाला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनंतर राज्यभर खळबळ उडाली होती. तसेच राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. 
        या प्रकरणात गुन्हेगारांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान, मारहाण झालेल्या या प्रेमी युगुलाने लग्न केल्याची बातमी समोर येत आहे. मेंढगावातील मंदिरात दोघांनी केलं लग्न केल्याची माहिती आहे. दरम्यान, पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना जालना जिल्ह्यात घडली होती. जालना तालुक्यातील गोंदेगाव शिवारात प्रेमीयुगलास बेदम मारहाण करण्यात आली होती. मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. प्रेमीयुगल बुलढाणा जिल्ह्यातील आहे. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल घेण्यात येवून गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती.

No comments:

Post a Comment