Saturday, March 14, 2020

बुलढाण्यात कोरोना संशयित रुग्णांचा मृत्यू


महाराष्ट्रातील हा कोरोना संशयिताचा पहिलाच मृत्यू असल्याने खळबळ उडाली
सदर वृद्ध हे चिखली तालुक्यात असून ते शुक्रवारी सौदी अरब येथून परत आले होते
जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खबरदारीच्या दृष्टीकोणातून ठेवण्यात आले होते
बुलडाणा : प्रतिनिधी
     सौदी अरेबिया येथून परतल्यानंतर कोरोनाचे सदृश्य लक्षणे आढळून आलेल्या कोरोनाच्या ७१ वर्षीय संशयीत रुग्णांचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात शनिवारी दुपारच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाराष्ट्रतील कोरोना संशयीत हा पहिलाच मृत्यू असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या रुग्णाची तपासणीचे अहवाल अद्याप आले नसल्याने सध्या तरी तो कोरोना संशयितच असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी सांगितले.
        सदर वृद्ध हे चिखली तालुक्यातील असून ते शुक्रवारी सौदी अरेबिया येथून परत आले होते ताप आणि सर्दी ची लक्षणे आढळल्या मुळे  त्यांना अगोदर एका खासगी रुग्णालयात ठेवण्यात आले. परंतु कोरोणा सदृश्य लक्षणे आढळल्यामुळे त्यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील विलगीकरण कक्षात खबरदारीचे दृष्टिकोनातून ठेवण्यात आले होते सदर  व्यक्तीस आधीपासूनच मधुमेह व इतर आजार असल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर होती जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना सायंकाळी चार वाजता सुमारास मृत्यू झाला. या रुग्णांचे नमुने हे नागपूरला पाठवण्यात आले असून १५ मार्च रोजी सायंकाळी किंवा १६ मार्च दुपारपर्यंत त्यांचा अहवाल जिल्हा सामान्य रूग्णालयात प्राप्त होणार आहे. तो रग्ण कोरोनाचाच आहे हे सीद्ध होण्यासाठी त्याचे अधीकृत रिपोर्ट वरूनच निच्छित होईल .परंतू या रग्णाच्या मृत्यू ने प्रशासन व अख्खा महाराष्ट्र भयपीत झाला आहे .ऐवढे मात्र खरे ..

1 comment: