देऊळगावराजा : अशरफ पटेल
क्या कोरोना? नहीं रोना, उससे है लढना... बस, घर के बाहर नहीं पडना जगभर थैमान घातलेल्या कोरोनाशी दोन हात करायचे आहेत. त्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता कफ्यूर्ची हाक दिली. त्याला प्रतिसाद देत सकाळी सात ते रात्री नऊपर्यंत घराबाहेर पडायचे नाही, हेच कोरोनाशी लढण्याचे प्रभावी शस्त्र आहे. १३० कोटींच्या या देशात सर्व जाती-धमार्चे लोक गुण्यागोविंदाने जगतात. देशावर कुठलेही संकट आले, की एक होतात. आलेल्या संकटाला पळवून लावतात, हीच एकी आता पुन्हा एकदा दाखवून द्यायची आहे. जनता कर्फ्यू, देऊळगावकरांनो सहभागी व्हा...
आपल्या भारतात अजूनही या रोगाला प्रतिकार करण्याची आहे शक्ती संपूर्ण जग हे कोरोनाच्या भीतीने त्रस्त आहे. आपल्या भारतात अजूनही या रोगाला प्रतिकार करण्याची शक्ती आहे. या रोगाला बाहेर काढण्याची ताकद आहे. आपण अजूनही या रोगाला प्रतिकार करू शकतो. देऊळगावकरानो घाबरू नका. स्वच्छतेचे सर्व नियम पाळा आणि प्रतिकार करा. हात सारखे स्वच्छ धुवा, बाहेर पडणे बंद करा. शासन ज्या पद्धतीने नियम सांगत आहे त्या पद्धतीने वागण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करा. यामुळे आपल्या देशात कोरोनापासून आपले संरक्षण होऊ शकेल. जनता कफ्यूर्ला साथ देऊया कोरोनाला पळवून लावायचे आहे. यात सहभागी होनाऱ्या कामगारांचे वेतन कापू नका. कारण हीच मंडळी देशाचे भविष्य आहे.
बाहेर पडू नका, प्रवास करू नका
ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना या रोगापासून जास्त जपा. कारण त्यांची प्रतिकार शक्ती कमी असते. डॉक्टरांनी याबद्दल सजग केले आहे. आपण या लोकांची मनापासून काळजी घेणे गरजेचे आहे. लोक बनावट सॅनिटायझर आणि इतर गोष्टी विकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला प्रतिबंध करा. स्वत:ची काळजी घेता येईल तितक्या प्रमाणावर काळजी घ्या. बाहेर पडू नका. प्रवास करू नका. आपल्याला संसर्ग झाला तर इतरांना होऊ नये याचीही काळजी घ्या. डॉ.सारीका भगत, तहसीलदार देऊळगावराजा
मुलांना वेळ द्या, वाचण्यास प्रवृत्त करा
पंतप्रधानाच्या सूचनांचे प्रत्येकांनी तंतोतंत पालन करावे, घराच्या बाहेर कोणीच पडू नये. पालकांनी मुलांसाठी वेळ द्यावा, मुलांसमवेत राहून मुलांच्या भावना काय आहेत. त्यांचा रस कशात आहे, तो सुटीच्या दिवसात समजून घेतला पाहिजे. मुलांना सुटीच्या काळात जास्त करून वाचन करण्यावर भर दिला पाहिजे. थोर विचारवंतांची पुस्तके वाचण्यासाठी उपलब्ध करून दिली पाहीजे. सुटीच्या काळात विद्यार्थ्यांना घेऊन इतरत्र सामूहिक कार्यक्रमास जाण्याचा मोह आवरला पाहिजे. सध्या राज्यात कोरोनाचे थैमान सुुरू आहे. स्वत:पासून काळजी घेण्याची गरज आहे.
सौ.सुनिता रामदास शिंदे, नगराध्यक्षा न.प. देऊळगावराजा
कृपया जनता कर्फ्यू नक्की पाळा
देऊळगावकरांनो आपण बालाजीच्या कृपेने अशा छान ठिकाणी राहतो की जिथे कोणतीही आपत्ती येत नाही. कोरोनाचे वादळ हे सर्व जगाला त्रास देणारे आहे. त्यामुळे आपण निर्धास्त राहून चालणार नाही. त्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या त्या कराव्या. वारंवार हात धुवावे. प्रवास करणे टाळावे. बाहेर जाणे टाळावे. मास्क वापरावा. शिवाय आपल्याला काही संसर्गजन्य वाटत असेल तर त्वरित वैद्यकीय सेवेतून चाचणी करावी. या काळात सगळ्या गोष्टी विक्री होणे बंद असणार आहेत. तेव्हा अशा गोष्टी खरेदी करून ठेवा. शक्यतो घराबाहेर पडणे बंद करा. जनता कर्फ्यू नक्की पाळा.
आसमा शाहिन मुजावर, वैधकिय अधिकक्षक देऊळगावराजा
शक्यतो प्रवास टाळावा
जनता कर्फ्यू आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. नागरिकांनी या उपक्रमाला साथ द्यावी. गर्दी टाळणे हा कोरोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. त्यामुळे राज्यभरात त्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोना विषाणू दिवसेंदिवस घट्ट होत आहे. अशा वेळी स्वत: सुरक्षित राहून इतरांनाही सतर्क राहण्यासाठी सांगावे, शक्यतो प्रवास टाळावा.
सुषमा राऊत, जिल्हा अध्यक्षा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संघटना


नक्कीच....
ReplyDeleteमा.पंतप्रधान महोदयांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद द्यायला हवा.
प्रा. एम.बी.जाधव
ReplyDeleteऔर एक दूसरे से मुलाकात कम करे
ReplyDelete