आपला परिसर स्वच्छ आणि फवारणी करीत आहे
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कोरोना या जीवाणूला हद्दपार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सरकारला जनतेने आवश्यक वेळी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढीच रास्त अपेक्षा सरकार जनतेला करत आहे. परंतु देऊळगावराजा नगर पालिका सद्या कुंभकरणीय झोपेत असल्याने माजी नगरसेवक प्रदिप वाघ यांनी आपला परिसर स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
देऊळगावराजा नागर पालिका आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी करण्याचा कार्यक्रम हाती घेतला पाहिजे होता कारण या जंतुनाशक फवारणीमुळे शहरातील दूषीत झालेल्या वातावरणामध्ये बदल होईल, घाणीमध्ये असणारे किटाणूचा नाश होईल, जेणेकरून स्वच्छतेवर एक भर पडेल, याच हेतूमधून फवारणी करण्याची गरज आहे. परंतु देऊळगावराजा गर पालिकेत सद्या १५ ते १६ कर्मचारी मुख्यलायी राहत नाही ते सर्व कर्मचारी बाहेर गावा वरुन ये जा करीत आहे. सद्या खाजगी वाहतूक बंद असल्याने ते आपल्या घरीच थांबले आहे. म्हणून देऊळगावराजा नगर पालिका राम भरोसे सुरु आहे. कारण नगर पालिका प्रशासन या ओलल्या आपत्तीत कोणताच सहभाग देत नसल्याचे चित्र देसून येत आहे. यासाठी माजी नगर सेवक प्रदिप वाघ यांनी स्वत आपल्या खिशातून पैसे खर्च करुन परिसर स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. फवारणी दरम्यान, घराबाहेर पडू नये अशा सूचना देत आहे. आपल्या संपूर्ण परीसरातील प्रमुख रस्ते हे, वॉडार्तील रस्ते रस्त्यालगत असलेल्या दुकानांच्या समोरील भागावर सांडपाणी वाहून नेणाºया नाल्यावर स्वत माणूस लावून शानिवार पासून जंतुनाशक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. फवारणी केल्यामुळे स्वच्छतेवर भर पडेल व घाणीचे साम्राज्य नष्ट होईल, नगरपरिषद मधील आरोग्य विभागाच्या मार्फत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात काम आहे. कोरोना या जीवाणूशी युद्ध करण्यासाठी स्वत: काळजी घेणे महत्वाचे आहे.दिवसांमधून सर्वच नागरिकांनी दहा ते बारा वेळा आपले हात साबणाने स्वच्छ धुवावे सॅनिटायझरचा वापर करावा. पाच पेक्षा अधिक लोकांनी एकत्र गर्दी करू नये, किमान एक मीटरचे अंतर ठेवावे, गर्दी टाळावी. कोरोना या विषाणूची लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करून उपचार घ्यावा, असा आवाहन माजी नगरसेवक प्रदिप वाघ यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.





No comments:
Post a Comment