शहरात उत्स्फूर्तपणे संचारबंदीला नागरिकांचा पाठिंबा
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
मागील अनेक दिवसापासून कोरोना व्हायरसने संपूर्ण देश व राज्य झुजंत आहे. याच पार्श्वभूमीवर तालुक्यात आता कडक संचारबंदी लागू करण्यात आली. या वेळी नागरिकांनी सुद्धा या बंद ला शातप्रतिशत साथ देत पोलिसांना सहकार्य करीत आहे. गरजेच्या वेळी रूग्णांना रक्ताचा तुटवडा हूंऊ नये म्हणून देऊळगाव राजा येथे नगर पालिका नवीन इमारतींत शनिवारी सकाळी १० ते २ पर्यंत सुरक्षितता बाळगून रक्तदान करण्या करिता येण्याचे आवाहन तहसीलदार डॉ.सारिका भगत आणि वैदकीय अधीक्षक आसमा शाहीन मुजावर यांनी केली आहे.
जीवनावश्यक वस्तूंसह दैनंदिन जीवनातील सामग्री ही उपलब्ध व्हावे याकरिता त्याच्या साठी शासन झटत आहे. देऊळगाव राजा शहर व तालुक्यात पोलीस प्रशासनाच्या सतर्कते मुळे सद्यास्थित पूर्णता लॉकडावून आहे. मात्र शहरात काही मजूर आणि बाहेरून आलेल्ल्या लोकांना वर उपासमारीची वेळ आलेली आहे. प्रशासनच्या वतीने या गरजू लोकांना मदत करण्याची गरज आहे.


No comments:
Post a Comment