पत्रकारांनी केले घरीच राहण्याचे आवाहन...
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कोरोना या जीवाणूला हद्दपार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सरकारला जनतेने आवश्यक वेळी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढीच रास्त अपेक्षा सरकार जनतेला करत आहे. आपला परिसर स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ते साध्या काय करतात? कोरोना व्हायरसमुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात देऊळगावराजा तालुक्यातील पत्रकार काय करतात? हे साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या माध्यमातून जाणून घेऊ...
स्वत: काळजी घ्या...
लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाकडून नागरिकांना घरामध्ये राहण्याच्या व गर्दी टाळण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. स्वत: काळजी घेण्याची गरज आहे. मी पत्रकार आपल्या मिळालेल्या वेळेच्या लाभ घेत माझ्या परिवाराला वेळ देत स्वंयपाकात मदत करीत आहे. तुम्ही पण आपली व परिवाराची या महामारीच्या काळात काळजी घ्या आणि घरीच रहा...सुषमा राऊत, पत्रकार देऊळगावराजा
कोरोना नावाचे संकट जगावर ओढवलेले आहे निसर्गाच्या प्रकोपाने प्रगतिशील राष्ट्रही हतबल झाले आहे ह्या भयावह परिस्थिती चा आपण सर्वांनी समर्थपणे सामना करायला पाहिजे सर्व भारतीयांनी एकजुटीने राज्य व केंद्राच्या सूचनांचे पालन करा , आपल्या साठी जीव धोक्यात टाकून काम करणा?्या आरोग्य कर्मचारी, पोलीस आणि पत्रकार बांधवांचा सन्मान करा लॉक डाऊन चे नियम पाळा घरीच रहा.
मुशीर खान कोटकर, पत्रकार देऊळगावराजा
मीच माझा व परिवाराचा रक्षक..
कोरोनाचा धोका जाणुन आहात, सरकार त्यांच्यापरीने घराबाहेर न पडण्याचे आवाहन करत आहे, आपणही विविध न्यूज चॅनेल्स व सोशल मीडियावर कोरोनामुळे हजारो नागरिक मरण पावत असल्याचा बातम्या व व्हिडीओ बघता आहात, हे बघुन मन भीतीपोटी धास्तावले आहे. म्हणुनच मी काळजी घेत परिवारासोबत घरातच आहे, धोका टळेपर्यंत तुम्ही पण कृपया बाहेर पडु नका, त्यासाठी आपणही थोडी खबरदारी घेणे ही काळाची गरज आहे...
अर्जुनकुमार आंधळे, पत्रकार देऊळगावराजा
पुजा करा आणि घरीच बसा
लॉकडाऊनमुळे परिसरातील गोरगरीब, मजूर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा कुटुंबांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषित केला आहे. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहचून त्यांना मदत करा, आणि घरी राहून पुजा अर्चना करा व सुरक्षित रहा...
प्रशांत पंडित, पत्रकार देऊळगावराजा
जगभरात कोरोना विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोना ला हद्दपार करण्यासाठी यावर उपाय म्हणून केंद्र आणि राज्य सरकार आपल्या ला सुरक्षित ठेवण्यासाठी घेरी राहण्याचे आवाहन करीत आहे. त्या सूचनेचा पालन करून मी घरी बसून काम करीत आहे. त्यामुळे सर्वांना विनंती आहे की घरीच रहा व कोरोनाला हद्दपार करा, आणि घरीच रहा...
अशरफ पटेल, संपादक देऊळगावराजा






Nice bhau
ReplyDelete