पत्रकारांनी केले घरीच राहण्याचे आवाहन...
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कोरोना या जीवाणूला हद्दपार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सरकारला जनतेने आवश्यक वेळी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढीच रास्त अपेक्षा सरकार जनतेला करत आहे. आपला परिसर स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ते साध्या काय करतात? कोरोना व्हायरसमुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात देऊळगावराजा तालुक्यातील पत्रकार काय करतात? हे साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या माध्यमातून जाणून घेऊ... 
सुधरा नाही तर कोरोना येईल!
विषाणूमुळे (कोव्हीड-१९) उद्भवणा-या संसर्गजन्य आजारामुळे आरोग्य विषयक आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, आता तरी सुघरा नाही तर कोरोना येईल! आपल्या परिवाराची काळजी घ्या...
प्रदिप हिवाळे, पत्रकार देऊळगावमही
जगभरात कोरोना ने हाहाकार माजवला आहे यावर उपाय म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यावतीने घरीच राहण्याच्या वारंवार सूचना देण्यात येत आहे या सुचनेच पालन करीत असून गेल्या आठ दिवसापासून घरीच बसून पूर्णवेळ माज्या एकुलत्या एक मुली सोबत घालवत आहे त्यामुळे सर्वांना विनंती आहे की घरीच रहा व कोरोनाला हद्दपार करा..
सुनिल मतकर, पत्रकार देऊळगावमही
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर घरातच थांबून शासनाच्या सूचनांचे लॉकडाऊनचे पालन करीत आहे. यावेळी कोरोना संदभार्तील टीव्हीवरील अधिकृत माहितीचे अपडेट घेऊन सोशल मीडियाद्वारे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवत आहे. तसेच नागरिकांनी लॉकडाऊनच्या काळात बाहेर पडून स्वत:बरोबरच दुसºयांचा जीव धोक्यात घालू नये असे आवाहन करीत आहे.
गणेश डोके, संपादक देऊळगावराजा
नागरिकांनी घरीच बसून टिव्हीवर मनोरंजन बघा
कोरोनाच्या धोका वाढल्यामुळे सरकार वारंवार आवाहन करीत घरीच रहा परंतु काही नागरिकांनवर या अवाहानाचा कोणताच फायदा होतांना दिसून येत नाही तुमच्या मनोरंजनासाठी आम्ही केबल कधीच बंद पडू देणार नाही घरीच रहा आणि टिव्हीवर आपल्या आवडत्या मालीका पहा आणि नियमाचा पालन करा...
वसंता माळोदे, पत्रकार देऊळगावराजा
मी माझी रक्षक
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. कोरोना सारख्या विषाणूला टक्कर देण्यासाठी राज्य सरकार वारंवार सूचना देत आहे की आपण घरी सुरक्षित रहा त्या अनुषंगाने मी पूर्णवेळ घराचे काही महत्त्वपूर्ण काम आणि पुस्तकाचा वाचन करीत आहे तुम्ही पण पुस्तकांचे वाचन करा आणि घरीच रहा आणि सुरक्षित रहा...
पुजा कायंदे, पत्रकार देऊळगावराजा
लॉकडाऊन आदेश पालन करा
केन्द्र सरकार व महाराष्ट्र शासन जिल्हा आधीकारी यांनी सर्वांना मते कोरोना व्हॉयरस भयंकर रोग यावर संपूर्ण भारतभर लॉकडाऊन आदेश दिले मी त्याचे पालन करून घरीच लेकरात बसून हसत खेळत व पत्रकारी का ची माहिती फोनवर घेऊन काम करत आहे परंतू मी घेतलेली जबाबदारी वृतपत्र वितरण करण्याची ती पण सकाळी ५ ते ९ पर्यंत करून घरात लॉकडाऊन आदेश पालन करतो.
प्रकाश साकला, पत्रकार देऊळगावमही






No comments:
Post a Comment