पत्रकारांनी केले घरीच राहण्याचे आवाहन...
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कोरोना या जीवाणूला हद्दपार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सरकारला जनतेने आवश्यक वेळी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढीच रास्त अपेक्षा सरकार जनतेला करत आहे. आपला परिसर स्वच्छ करुन जंतुनाशक फवारणी करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ते साध्या काय करतात? कोरोना व्हायरसमुळे देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.दरम्यानच्या काळात देऊळगावराजा तालुक्यातील पत्रकार काय करतात? हे साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या माध्यमातून जाणून घेऊ... 

मी माझा रक्षक...
संपूर्ण लॉकडाऊन असल्यामुळे प्रत्येकांनी आपल्या घरीच थांबावे मी दररोज एक तास धार्मिक कामे करीत आहेत, पुस्तक वाचन करणे तसेच माझ्या नाटकाच्या रियसल करतो, आणि काही वेळ कार्टून काढण्याचा छंद जोपासतो. कोरोना विषयी जनजागृती करतो आणि दररोज वृत्तसंकलन करुन प्रशासनास सहकार्य करीत आहेत. तुम्हा पण सहकार्य करा आणि घरीच थांबा...
पुस्तके वाचा...लॉक डाऊन दरम्यान वपु चे प्रसिद्ध वपूरझाई वाचण्याचा आनंद घेताना तसेच मृत्यूजय, गोळाबेरीज असा बुद्धीला चालना देणारे दजेर्दार पुस्तके वाचली असून याबरोबरच शहरात फिरून नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देत आहे. गोरगरिबांना जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करीत आहेत, आपण घरात रहा सुाक्षित रहा...
सन्मती जैन, ग्रंथपाल देऊळगावराजा
मी माझ्या कुटूंबा सोबत आहेत. दरम्या कधी शेतातील कामात लक्ष घालत आहे. आज खूप दिवसानंतर या लॉकडाऊन मूळे वेळ मिळाला त्याचा भरपूर लाभ घेत शेतात मिरचीला माझ्या हाताने फवारणी करुन आनंद मिळाला म्हणून आपण सरकार कडून दिलेल्या सांधीचा सोना करुन दाखवा आणि सुरक्षित रहा हिच अपेक्षा...
रमेश चव्हाण, पत्रकार देऊळगावराजा
हिच वेळ...घरीच रहा
शहरातील नेहमीच आपल्या ग्रहकासाठी नवनवीन तत्रज्ञान आणून ग्राहकांना आकर्षित करत असतात त्यातच लॉकडाउन मुळे भरपूर वेळ असल्याने आपले कॅमेरे अपडेट करून नवीन काही करता येईल का यासाठी कॅमेरा सोबत खेळताना. तरी आपण घरीच रहा आणि काम करा...
विलास जगताप, पत्रकार देऊळगावराजा




No comments:
Post a Comment