Tuesday, March 31, 2020

संचारबंदीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांसाठी मदतीचे हात सरसावले; धान्य, अन्न केले वाटप


सत्कार्य विविध ठिकाणी सुरक्षाची साधनांचेही वाटप, युवकांसह सामाजिक संस्थांनी घेतला पुढाकार
संकटात सापडलेल्या बांधवांना मदतीसाठी दानशुरांचा पुढाकार, अनेकांकडून घडले दातृत्वभावनेचे दर्शन 
 देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
           संचारबंदीमुळे प्रभावित झालेल्या गरिबांसाठी मदतीचे हात सरसावले असून, अन्नधान्य वाटपासाठी पुढाकार घेतला जात आहे. विविध ठिकाणी सुरक्षाी साधनांचेही वाटप करण्यात येत आहेत. यासाठी युवकांसह सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. त्यांच्या मदतीमुळे पालावरचे उपेक्षित, परप्रातांतून कामासाठी आलेल्यांची सोय झाली आहे. अशा दाहक वातावरणातही दानशूरांकडून दातृत्वभाव जोपासला जात आहे.
                सध्या कोरोना आजारामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली असल्याने मुले आणि काही कामगार शहरात अडकून राहीले. संचारबंदी असल्याने इच्छा असुनही त्यांना त्यांच्या जिल्ह्यात आणि राज्यात जाणे अवघड आहे.  कामगार आणि काही मुले घाबरलेल्या अवस्थेत होती. घराकडून फोन येत असल्याचे सांगून आई- वडील काळजी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. गावाकडे जाण्यासाठी सहकार्य करा, रेशन संपले आहे, एटीएममधून पैसे काढायचे म्हटल्यास विविध अडचणी येत असल्याचे सांगितले. तर शहरातीलइ सिव्हील कॉलोनीतीतल युवकांनी कामगार आणि मुलांना शोधून गहू, तांदूळ, डाळ, तेल, मिठ, मिरची, साखर, चहा पत्ती, बिसकिटे देऊन १८ परिवारांची मदत केली. याच युवकांनी शहरातील १०० गरजु आणि गरीबांनी रेशन देवून मदत करीत आहे. यासाठी सिव्हील कॉलनीतील युवकांनी पुढाकार घेतला आहे.
 
           नगरसेवक मो.रफीक यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तू वाटप
                नगरसेवक मो.रफीक व सामाजिक संस्थेच्या वतीने निराधार, विधवा, वृद्ध महिला, दिव्यांग पुरुषांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. अशा परिस्थितीत ज्यांना घराबाहेर पडणे शक्य नाही व ज्यांना कोणाचाही आधार नाही अशा कुटुंबाचा शोध घेऊन या संस्थेच्या वतीने घरी जाऊन जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. १०० कुटुंबामध्ये तीन किलो तांदूळ , पाच किलो गहू पीठ, एक लिटर तेल ,एक किलो साखर, एक किलो डाळ, एक पाकीट मीठ आणि एक पॉकेट हळद आशा जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे. यासाठी संस्थेचे सर्व सदस्यांनी   पुढाकार घेतला आहे.

      महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या वतीने समाज बांधवांना अन्नधान्य, किराणा वितरण
             संचारबंदीमुळे  शहर, तालुक्यातील अनेक नाभिक समाजाच्या हातावरील पोट असणारे कुटुंब तसेच रोजंदारीवर जाऊन दिनचर्या भागवणाºया कुटुंबाची संचारबंदीमध्ये वाताहत होत आहे. महाराष्ट्र नाभिक महामंडळच्या तरुणांनी परिसरातील राहणाºया ७५ गरीब कुटुंबाना उपजीविकेसाठी लागणारे अन्नधान्य व किराणा साहित्य वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. गहू, तांदूळ, आणि किराना वस्तुंचे किट करून वाटप करण्यात आले. तालुकाध्यक्ष सुनिल शेजूळकर, शहराध्यक्ष संदेश वाघ, उपाध्यक्ष सुमित खोडके, गणेश भुतेकर, दिपक वैद्य, विठ्ठल निंबाळकर पुढाकार घेत आहेत.
     
   नागरिकांसाठी राष्ट्रवादी पक्षाचे मदतीचे हात सरसावले;   
      कोरोना विष्णूचा संसर्ग टाळण्यासाठी देशभरात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर झाला आहे. ज्यांचे हक्काचे घर अन् त्यात आवश्यक दाणा पाणी आहे, त्यांना घरातच बसणे शक्य आहे. पण जे आपले घर जगावे म्हणून घरदार सोडून भविष्याची उमेद घेवून ते कामां साठी बाहेर गावी गेलेले आहे. त्यांच्या कुटूंबासाठी हा अनपेक्षित लॉकडाऊन लढून जीवन जगण्याचा संदेश देऊ पाहतोय. शहरात शांतता असलेल्या रस्त्यावर आणि झोपडपट्टीत राहणाºया गरीबांच्या चेहºयावर भाव पाहून एका कविने  देव जरी कोटी - कोटी, भाकरीची भूक मोठी, स्वर्ग भला जगासाठी, माझी भली पोटवटी, या कवितेच्या बोलक्या ओळी हमखास ओठावर येतात. भाकर, भूक, व देव असा त्रिकोण चित्र डोळ्यासमोर येताच उभा राहतो. आपत्कालीन परिस्थितीत देऊळगावराजा शहरातील प्रत्येक भागातील गरजु आणि गरीबांसाठी राष्ट्रवादी पक्षाचे मदतीचे हात सरसावले;  आणि १५ दिवस पुरेल इतका रेशन प्रत्येक गरीबांचे घर पोहच देवून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. यासाठी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला.

1 comment: