देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे मुबंईचे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन आॅफीसर साहेब यांच्या आदेशाने व सामाजिक बांधिलकी जोपासत बुलडाणा जिल्ह्यातील बुलडाणा मेमन जमात, चिखली मेमन जमात, मेहकर मेमन जमात, मलकापूर मेमन जमातच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे पॅकेट तयार करुन वाटप सुरु केले आहे. या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.
मेमन समाज गरजू व्यक्तींच्या मदतीसाठी सदैव अग्रेसर असते. गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेणे, त्यांचा शालोपयोगी खर्च करणे, गरीब रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन देणे यासाठी या संस्था प्रयत्नरत असतात. ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे मुबंईचे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफीसर साहेब यांनी सध्याच्या बिकट परिस्थितीत गरजूंना मदतीचा हात पुढे केला. कोरोनाच्या संकट काळातही या संस्थेने गरिबांसाठी मदत पॅकेट तयार केले आहेत. त्यात जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यात गहू ५ किलो, तांदूळ ५ किलो, तूर डाळ १ किलो, तेल २ किलो, चवळी १ किलो, उडद डाळ १ किलो, मसूर डाळ १ किलो, साखर १ किलो, चहापत्ती २०० ग्राम, मीठ १ किलो, मिरची पावडर, गरम मसाला, हळद प्रत्येकी ५० ग्रॅम, बिस्किट पुडा १ अशा वस्तूंचा समावेश असून हे पाकिट प्रत्येक कुटुंबाला वितरीत करण्यात येत आहे. या उपक्रमाची सुरुवात बुलडाणा मेमन जमात अध्यक्ष हाजी मोहम्मद सेठ ठेकिया, चिखली मेमन जमात अध्यक्ष हाजी रशीद सेठ, मेहकर मेमन जमात अध्यक्ष जुबेर नाथानी, मलकापूर मेमन जमात अध्यक्ष हाजी मो.रफीक हरफा यांच्या हस्ते करण्यात आली. या प्रसंगी चार जमात चे पदाधिकारी व सदस्य आदींची प्रमुख उपस्थिती होती. कवितेच्या या ओळी ठरतात सार्थह्यबंद घोषित झाला आणि माज्या मनात धस्स झाले. जगण्याचे असंख्य प्रश्न, माज्या समोर उभे राहिले, कवितेतल्या या ओळी जेव्हा जीवनात प्रत्यक्ष अनुभवायला मिळतात, तेव्हा कवीची दार्शनिकता मान्य करावी लागते. सध्या कोरोनाच्या लॉकडाऊन कालावधीत सर्वात जास्त कुचंबणा होतेय, ती हातावर पोट असणाºया हातमजूर लोकांची. कापसाच्या जिनिंग मील, कारखाने, दुकाने, हॉटेल, बाजार बंद पडल्याने या ठिकाणी रोजंदारीवर काम करणाºया मजुरांना घरी बसावे लागले आहे. रोगापासून बचाव तर हवाच आहे. मात्र, पोटाची भूकही भागवायची आहे. घरी बसून कोरोनापासून दूर पळता येईल. परंतु, सदासोबत असणाºया पोटाच्या भुकेला कशी पळवून लावायची, ही चिंता आता गरीब मजुरांना सतावत आहे. अशा लोकांसाठी काही मेमन समाज पुढे येत आहेत.
येणाºया ११ एप्रिल रोजी मेमन डे आपल्या घरीच राहून साजरा करा कारण कारोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमिवर आपतकालीन परिस्थितीमुळे या आलेल्या काळचा समाना घरीच बसून करा तसेच ८ एप्रिल रोजी शबे बरात असल्याने सर्व समाज बांधवानी नमाज घरीच अदा करा तसेच अल्हा तआला शी प्रथना करा ह्या आलेल्या संकटला लवकरच दूर कर आणि शासनाने दिलेल्या आदंशाचे पालन करा असे आवाहन आॅल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे मुबंईचे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन आॅफीसर साहेब यांनी साप्ताहिक मातृतिर्थ एक्सप्रेसशी बोलतांना दिली आहे. तसेच समाज बांधवाना शबे बरात आणि मेमन डेच्या शुभेछा दिल्या.




No comments:
Post a Comment