Thursday, April 9, 2020

सलून व्यावसायिक लॉकडाऊन मुळे अडचणीत


 देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
            कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी असल्याने नागरिकांना घराबाहेर जाता येत नाही. याचा फटका हातावर पोट भरणाºयांना बसत आहे. याच पद्धतीने हातावर पोट असणारे ग्रामीण व शहरी भागातील सलून व्यावसायिक अडचणीचा सामना करत आहेत.
      शासनाने सोशल डिस्टन्सचे आवाहन केल्याने सलून व्यावसायिक अडचणीत आले आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सिंग मुळे घरी जाऊन सेवा देणेही शक्य नाही. जवळचे सर्व पैसे आता संपले आहेत. येणारा आठवडा कसा काढावा, असा प्रश्न या व्यावसायिकांना पडला आहे.
        शासनाने मदत करावी
       लॉकडाऊनमुळे दुकाने बंद आहेत. त्यामुळे कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे शासनाने सर्व व्यावसायिकांना मदत करावी, अशी अपेक्षा आहे.
                  सुनिल शेजुळकर, तालुकाध्यक्ष महाराष्ट्र नाभिक महामंडळ, देऊळगावराजा
         उदरनिवार्हाचा प्रश्न
         लॉकडाऊनमुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली. १५-१६ दिवसांपासून दुकाने बंद आहे. उदानिवार्हाचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाने मदत जाहीर करावी.
                 शिवानंद वैद्य, सलून व्यावसायिक, देऊळगावराजा   





 















         




 





 


No comments:

Post a Comment