Thursday, April 9, 2020

मातृतीर्थातील कोरोनाच्या लढाईसाठी सज्ज झाल्या रणरागिनी

तालुक्यातील महिला डॉक्टर, नर्स, महिला सफाई कर्मचारी, महिला पोलिस यांचा सिंहाचा वाटा,
 देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
            गेल्या तिन महिन्यापासून कोरोना या संसर्ग जन्य विषाणू ने थैमान घातले आहे. यावर वैद्यकीय शास्रात उपचाराकरिता औषधीचे निर्माण झालेले नाही, जेव्हापासून संपूर्ण जगात या कोरोनाने प्रवेश केला तेव्हापासून आजपर्यंत हजारो नागरिकांचा या महाभयंकर कोरोनाने गेम केलेला आहे. राज्यात सुद्धा या कोरोनाने डोके वर काढले असून संबंधीत संपूर्ण प्रशासकीय यंत्रणांची झोप उडाली आहे. कोरोनाचा संसर्ग झालेले नागरिक शासनाच्या रुग्णालयात विलीगीकरन कक्षात उपचार घेत आहे, यामध्ये दिवसेंदिवस रुग्णांची वाढ होतांना दिसत आहे, अशातच तालुक्यामध्ये महिला डॉक्टर, नर्स, नगर पालिकेतील महिला सफाई कर्मचारी, महिला पोलिस या महाभयंकर संकटाला सामोरे जातांना दिसून येत आहे.  
         कोरोनावर मात करण्यासाठी सध्य स्थितीत महसूल प्रशासन, नगर परिषद प्रशासन व आरोग्य विभाग सोबतच कायदा व सुव्यस्था अबाधित राखणेकरिता पोलिस प्रशासन यांची महत्वाची भूमिका आहे. तहसील स्तरावरून जवाबदारी पार पाडतांना या सर्वच प्रशासकीय यंत्रणा व त्यांच्या अधिनस्त कर्मचारी यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर यामध्ये भरिस भर म्हणून केंद्र सरकारने दि.२४ पासून १४ एप्रिल पर्यंत देशात लॉक डाऊन ची घोषणा केली नंतर सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील करण्यात आल्या व ज्या जिल्ह्यात इतर जिल्ह्यातुन व परराज्यातून आलेल्या नागरिकांना त्याच ठिकाणी थांबवून त्या नागरिकांच्या राहण्याची व खाण्या पिण्याची व्यवस्था करण्याचे आदेश आल्यानंतर अशा अडकलेल्या सर्व नागरिकांची व्यवस्था संबंधित प्रशासनाने केली. परंतु आपल्या आरोग्याची काळजी न करता नगर पालिकेतील महिला सफाई कर्मचारी रोज सकाळी दुपारी आणि सांध्याकाळी शहर स्वच्छ करतात, महिला पोलिस कर्मचारी आपल्या घरदार सोडून रक्षणासाठी रस्त्यावर उभे राहून शहरवासीयांची रक्षा करतात तसेच महिला डॉक्टर आणि नर्स अहोरात्र रुग्णाल्यात राहून आलेल्या रुग्णाची तपासणी करीत आहे. शहराची लोकसंख्या ३२ हजाराचे जवळपास आहे, कोरोना या आजाराचा शहरात १ रुग्ण आढळून आला असून त्याचा संपर्कात आलेल्या १८ नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने क्वारंटाईन केले आहे. परंतु तालुक्यात प्रामुख्याने ज्या महिला सफाई कामगार, महिला डॉक्टर, आरोग्य सेविका, महिला पोलिस, व अनेक महिला आज रोजी आपल्या संसार गाडा हाकतांना तसेच लहान मुलांना आपल्या पासून दूर ठेवून आलेल्या महामारीच्या संकटाला मोठ्या हिम्मतीने आहोरात्र सेवा देत आहे. त्यांच्या कायार्ची प्रशंसा करुन त्याना बळ देण्याची खरी गरज आहे.  





 















         




 





 


No comments:

Post a Comment