Friday, April 10, 2020

राजलक्ष्मी स्कुलकडून घरबसल्या अभ्यासाचे मोबाईल स्कूल लीड अँप तयार



_कोरोनामुळे विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रगतीत निर्माण अडथळा दूर..._
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
      शिक्षण ही द्विमार्गी पद्धत आहे. यामध्ये प्रथम विद्यार्थी आणि त्यानंतर पालक, शिक्षक व इतर घटकांचा समावेश होतो. यात  विद्यार्थी हा सर्वात मुख्य घटक असून त्या घटकाच्या विकासासाठी पालक, शिक्षक,  व इतरांनी नियमित कर्तव्यदक्ष राहणे महत्वाचे आहे. एक महिन्यापासून कोरोना या विषाणू मुळे संपूर्ण जग परेशान आहे. सद्या लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे विध्यार्थीयांचे अतोनात नुकसान होतांना दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नाये म्हणून स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने आपल्या विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देण्यासाठी अभ्यास करण्याला सुरुवात केली आहे तरी सर्व विद्यार्थ्यांनी या लीड स्कूल ॲपद्वारे अभ्यासाला सुरुवात करावी असे आव्हान संस्थेचे अध्यक्ष डॉ. सौ. मीनल शेळके व सचिव डॉ. रामप्रसाद शेळके यांनी केले आहे.

       आजच्या आधुनिक युगात शिक्षण पद्धतीमध्ये होणारे विविध बदल लक्षात घेऊन देऊळगाव राजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ने आपल्या विध्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे. असे म्हणतात की,' गुणवत्तेला पर्याय नसतो आणि नसलेला तो पर्याय आपण शोधत बसलो तर अधोगती होते.' यामुळेच जागतिक आपत्तीच्या काळातही विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती अखंडित सुरू ठेवण्यासाठी शाळेकडून लीड स्कूल ॲप विद्यार्थी व पालकांच्या सेवेत नियमित उपलब्ध करून देण्याचे धाडस राजलक्ष्मी स्कूल ने केलेला आहे. या ॲपच्या माध्यमातून वर्ग नर्सरी ते  १० वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आपला अभ्यास दृक - श्राव्य साधनांच्या माध्यमातून अत्याधिक आधुनिक पद्धतीने करीत आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना उच्च शिक्षा विभूषित शिक्षकांकडून पाठ्यपुस्तक घटकावर  घेण्यात येणाऱ्या  तासिकांचे थेट प्रक्षेपण, इ - बुक सुविधा, अध्यायनापयोगी नोट्स, वर्ग कार्य, गृहपाठ,  वेळापत्रक, दैनंदिन हजेरी, वार्षिक शैक्षणिक दिनदर्शिका इत्यादी कृतीयुक्त सर्व शिक्षणावश्यक सुविधा पालकांच्या घरापर्यंत उपलब्ध होत आहेत. केवळ एका क्लिकवर या सर्व आवश्यक सेवा कोठेही आणि केव्हाही पालकांना प्राप्त होत असल्याने  पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे. शाळेच्या अध्यक्षा डॉ. सौ. मीनल शेळके व सचिव डॉ. श्री. रामप्रसाद शेळके यांनी सर्व पालकांना हे ॲप डाऊनलोड करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी याचा नियमित वापर करण्याचे आवाहन केलेले आहे. आजच्या स्पर्धेच्या युगामध्ये वाढणारी शैक्षणिक गुणवत्ता आणि या स्पर्धेमध्ये कायम टिकून राहण्यासाठी पालकांकडून निवडले जाणारे बहुपर्याय लक्षात घेता या वर्षापासून शाळेकडून ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापनासाठी अधिकाधिक पालकांकडून या ॲपचा वापर केला जात आहे. आरोग्य आपत्तीच्या काळात देऊळगाव राजा शहरामध्ये अशी सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या एकमेव द्वितीय शाळेचा मान राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल ला प्राप्त झाला आहे. याबद्दल शाळेचे सचिव डॉ.  रामप्रसाद शेळके सरांनी सर्व पालकांचे आभार व्यक्त करून कोराेना सारख्या जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी स्वतःबरोबरच आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन सर्व पालकांना केले आहे. 

             याप्रसंगी शाळेच्या अध्यक्षा डॉ. सौ. मीनल रामप्रसाद शेळके या लीड स्कूल ॲप व शाळेत होणारया उपक्रमा बद्दल माहिती देत म्हणाल्या की, प्रत्येक वर्षागणिक आम्ही अध्ययन अध्यापनाच्या पद्धतीमध्ये आधुनिक घटकांचा समावेश करीत आहोत. त्यामुळेच यावर्षी मॅथ व सायन्स ओलंपियाड परीक्षेच्या दुसऱ्या लेव्हल मध्ये सहा विद्यार्थ्यांची निवड झाली होती. डॉ. होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी चार विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक मिळाले. मदर तेरेसा फाउंडेशन कडून घेण्यात आलेल्या चित्रकला व सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये शाळेला 'बेस्ट स्कूल अवार्ड' व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले, एन. एस. सी.पी. परीक्षेत सहभागी झालेल्या सर्व ४४ विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही विद्यार्थ्यांनी राज्य स्तरापर्यंत मजल मारली आहे. दुबई येथे आयोजित इंटरनॅशनल स्कूल अवार्ड  २०१९ - २० समारंभामध्ये शाळेला 'सर्वोत्कृष्ट शिक्षण व व्यवस्थापन' पारितोषिक मिळाले आहे. अल्पावधीत शाळेला मिळालेले हे स्थान कायम टिकवून ठेवण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. काळानुसार शिक्षण पद्धतीमध्ये होणारे नवनवीन बदल स्वीकारून विद्यार्थ्यांबरोबरच शाळेच्या गुणवत्तेचा आलेख उंचावण्यासाठी नियमित प्रयत्नशील राहू असे आश्वासन त्यांनी दिले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
  


1 comment: