Friday, April 10, 2020

ग्रामीण रुग्णालयात ड्युटीवर येण्यास टाळाटाळ


आरोग्य अधिकाऱ्यास तहसीलदारांनी बजावली नोटीस
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
      कोरोना संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध घालण्यासाठी अत्यावश्यक आरोग्य सेवा देण्यास हेतूपुरस्पर टाळाटाळ करणाऱ्या महिला आरोग्य अधिकारी यांना  तहसीलदार डॉ.सारीका भगत यांनी नोटीस बजावून जाब विचारला आहे.  
      सद्यस्थितीत देशासह राज्यातील सर्व जिल्ह्यात लॉक डाऊन करण्यात आले आहे. मागील आठवड्यात शहरात एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाल्याने आरोग्य विभागासह संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे त्यातच बुलढाणा जिल्ह्यातील सहा हाय रिस्क झोन मध्ये समाविष्ट तालुक्यात देऊळगाव राजा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला आहे तालुक्यात कोरूना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या १८ जणांना कोरणटाईन करण्यात आले शहरातील काही खाजगी दवाखाने बंद आहे. अशा परिस्थितीत रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामीण रुग्णालयात कार्यरत आरोग्य अधिकाऱ्यांवर कामाचा तान वाढला आहे मागील आठवडाभरापासून ग्रामीण रुग्णालयात तीन डॉक्टर अनुपस्थित राहत असल्याने आरोग्य सुविधा वर परिणाम होत आहे याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या आरोग्य अधीक्षक असमा खान यांनी नोटीस बजावल्यानंतर ही डॉक्टर रुजू होत नाही दरम्यान दि.८ एप्रिल रोजी तहसीलदार यांनी बोलावलेल्या अत्यावश्यक बैठकीत दोन वैद्यकीय अधिकारी हजर राहिले तर डॉ. वैशाली मांटे सदर बैठकीत गैरहजर राहिल्या यावेळी त्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करण्याचा अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला असता त्यांचे पती यांनी अधिकाऱ्यांना उर्मटपणे बोलून माझी पत्नी ग्रामीण रुग्णालयात रुजू होणार नाही म्हणून सांगितले घडलेल्या सदर प्रकारानंतर तहसीलदार डॉ.सारीका भगत यांनी वैद्यकीय अधिकारी वैशाली मांटे यांना नोटीस बजावून कारवाईचा इशारा दिला आहे.

No comments:

Post a Comment