Saturday, April 11, 2020

गरजूंना मदतीसाठी सरसावले 'पठाण बंधू...!


जीवन आवश्यक वस्तूंचे केले वाटप....
देऊळगाव मही : अशरफ पटेल
      कोरोना या विषाणूच्या प्रकोप वाढल्यामूळे  देशभर संपूर्ण बंद असल्याने तसेच संचारबंदी कायदा लागू आहे, व देऊळगाव राजा तालुक्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यामुळे संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामूळे ग्रामीण शेतमजुर, रोजमजुर यांच्या हाताला काम नसल्यामुळे तो अडचणीत सापडला आहे. यांनाच एक मदतीचा हात म्हणून मंडपगाव येथील पठाण बंधू मा.उपसरपंच राजू पठाण व बंधू यांच्या वतीने १० क्विंटल गहू, ६ क्विंटल तांदूळ, १ क्विंटल दाळ, आणि तेल या जीवन आवश्यक वस्तूंचे सामान्य जनतेला मंडपगाव येथे वाटप करण्यात आले.

        यानिमित्त सर्व धान्य व जीवनावश्यक वस्तू ची पॅकिंग करून घरपोच सर्व वस्तू देण्यात आल्या. यामध्ये नेहमी समाज कार्यात अग्रेसर असणारे पठाण बंधू मा.उपसरपंच मंडपगाव राजू पठाण, साजिद पठाण,संपादक आदील पठाण यांनी सदर उपक्रम पार पडत परिश्रम घेतले. या निमीत्त बोलतांना राजू पठाण म्हणाले मला ही नेहमी समतेचे महत्व सांगत आपण समाजाचे काही देणे लागतो म्हणून संकटावेळी समाज कार्य केलेच पाहिजे ही शिकवण माझे वडील देतात, आणि समस्थ परिवार ही यामध्ये आनंदाने सहभागी होतो त्यामुळे बळ मिळते, प्रेरणा मिळते माझ्या पाठीशी खंबिर पणे उभे असलेले माझ्या परिवारा मुळे. या पुढे ही जर लोकडाऊन वाढेल तर आम्ही जनतेच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहू असे ही पठाण यावेळी म्हणाले. या समाजहिताच्या उपक्रमामुळे परिसरात पठाण बंधूंचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment