देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
देशावर पहिल्यांदाच संकट आले आहे. त्यामुळे नेमकी भूमिका काय घ्यायची हे कळत नाहीय. परंतु जसजसे दिवस जातील यामध्ये स्थिरता येईल... लोकांना समज येईल व लोक काळजी करायला लागतील... प्रतिसाद देतील.. त्यामुळे कायदा हातात घेण्याचा कुणी प्रयत्न करू नये आणि कारण नसताना घराबाहेर पडू नये, अशा स्पष्ट सूचना राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी जनतेला दिल्या आहेत.
आपल्यातील काही लोक बातम्या व अफवांवर विश्वास ठेवून खूप मोठी गर्दी करत आहेत. वास्तविक शेतकºयांचा तयार झालेला माल आणणं व तो ग्राहकापर्यंत पोचवणं, जीवनावश्यक वस्तू पोहचवणं यामध्ये सरकार बारकाईने लक्ष देत आहे. परंतु कधी कधी पोलीस विभागातील अधिकारी दिसेल त्याला मारत आहेत. वास्तविक अत्यावश्यक सेवा पुरवणारा जो कर्मचारी आहे, व्यापारी आहे त्यांना त्रास होता कामा नये अशा सूचनाही राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी साप्ताहिक मातृतिर्थ एक्सप्रेसच्या प्रतिनिधीशी बोलताना केल्या.


No comments:
Post a Comment