तपासणीसाठी स्वत: ग्रामीण रुग्णालयात घेतली धाव
ना.डॉ.शिंगणे यांच्या तत्परतेने तरुणी बुलडाणा रवाना
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
तालुक्यातील देऊळगावमही येथे पुण्यातनू आलेल्या मुलीला सर्दी आणि ताप जाणवल्याने तरुणीने दोन दिवस देऊळगावमही येथेच उपचार केले. परंतु तरुणीचेसमाधान न झाल्याने पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नंतर बुलडाणा येथे उपचारासाठी स्वंयम धाडस दाखविले. याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री यांच्याशी सदर तरुणीच्या नातेवाईकांनी संपर्क करुन माहिती दिली. ना.डॉ.शिंगणे यांनी तत्पराता दाखवून सदर तरुणीस जि.प.सभापती रियाजखॉ पठाण यांच्याशी संपर्क करुन तरुणीस योग्य ती मदत करावी व तात्काळ बुलडाणी ज्लिहा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले.
सद्या कोरोना मुळे जगभरातील देशाना संकटाचा सामना करावा लागत आहे. जागतीक आरोग्य संघटना आणी सर्व देश कोरोनाचा प्रदूभाव रोखण्या करीता अनेक उपाय योजना करीत आहे. अशताच बुलडाणा जिलह्यातील अनेक तरुन आणि तरुणी शिक्षणासाठी महानगरात गेलेले आहेत. यातच तालुक्यातील देऊहगावमही येथील एक तरुणी पुणे येथे उच शिक्षणासाठी मागील ४ ते ५ वषार्पासून शिक्षण ेधत होती. तर देशाचे प्रधानमंत्री यांनी पुर्ण देशाला लॉकडाऊनची घोषणा केली. करीता अनेक जन आपल्या गावी परत आले. दि.२१ मार्च रोजी देऊळगावमही येथील तरुणी मध्य रात्री नंतर घरी आल्यावर थोडी फार विश्रांती घेतली दुसºया दिवशी तिला ताप वू सर्दीचा त्रास झाल्याने गावातच उपचार केले. परंतु दि.२६ मार्च रोजी फरक न जाणवल्याने व समाधान न झाल्याने तरुणीने दोन दिवस देऊळगावमही येथेच उपचार केले. पुढील उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय नंतर बुलडाणा येथे उपचारासाठी स्वंयम धाडस दाखविले. याबाबत राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री यांच्याशी सदर तरुणीच्या नातेवाईकांनी संपर्क करुन माहिती दिली. ना.डॉ.शिंगणे यांनी तत्पराता दाखवून सदर तरुणीस जि.प.सभापती रियाजखॉ पठाण यांच्याशी संपर्क करुन तरुणीस योग्य ती मदत करावी व तात्काळ बुलडाणी ज्लिहा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्याचे आदेश दिले. जि.प.सभापती रियाजखॉ पठाण यांनी येथील पोलिस पाटील व अकील काजी यांना बोलावून घेऊन त्वरित उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल केले तेव्हा आज मुलीच्या हातावर ठसा लावून पुढील उपचारासाठी बुलढाणा येथे रुग्णालयात भर्ती करण्यात आले. याबाबत सदर तरुणीचे तपासणी नंतरच कळेल एवढे मात्र खरे.... या घटनेने तालुक्यात खळबळ माजली आहे. तर सदर तरुणीच्या जवळपास असलेल्या सर्व लोकांना काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासनमंत्री ना.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी केले आहे. त्वरीत माझ्याशी संपर्क साधावा आणि घाबरुन जावू नका योग्य वेळी तपासणी करुन घ्या असा सल्ला ही दिला.
जीवनावश्यक वस्तू दुकानांपुढे अंतराचे लक्ष्मणरेखा चौकोन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी होणारी गर्दी रोखण्यासाठी व कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासनाने ही खबरदारी घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, भाजीपाला, किराना दुकान, मेडिकल दुकानांपुढे अंतराचे लक्ष्मणरेखा चौकोन मधेच थांबुन सामान खरेदी करा
डॉ.सारीका भगत, तहसीलदार देऊळगावराजा
गरज असेल तरच रुग्णालयात जावे ?
ताप, सर्दी, खोकला, परदेशी व्यक्तीसोबत असाल तसेच परदेशातून आला असाल तरच स्क्रीनिंग करण्याची गरज आहे. त्यामुळे उगाचच नागरिकांनी हॉस्पिटलमध्ये गर्दी करू नये. वाढणाºया गदीर्मुळे आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज नसेल तर हॉस्पिटलमध्ये जाणे टाळणे गरजेचे आहे.
डॉ. आसमा शाहिन मुजावर, आरोग्य अधिक्षक, देऊळगावराजा
विनाकारण घराबाहेर व रस्त्यावर आढल्यास कार्यवाही
शासन आदेशानूसार कोरोना विष्णूचा होणारा प्रादूभाव रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. विनाकारण घराबाहेर व रस्त्यावर आढल्यास साथरोग प्रतिबंधक अधिनियम १८९७ व भादवी कलम १८८, २६९, २७०, २७१ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.
सभांजी पाटील, पोलीस निरिक्षक देऊळगावराजा


No comments:
Post a Comment