Saturday, April 11, 2020

कोरोना व्हायरसमुळे खरीप हंगाम शेतकºयांसाठी ठरणार अडचणीचा



कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प, नोटबंदीची आठवण
 देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
         दिवसेंदिवस कोरोनाचे संकट गहिरे होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामही शेतकºयांसाठी जगण्याची कसोटी पाहणारा ठरणार असल्याचे दिसून येत आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे अद्यापही आर्थिक घडी सावरण्याची कोणतीही चिन्हे नसताना कोरोनाच्या संकटामुळे आगामी खरीप हंगामही शेतकºयांसाठी अडचणीचा ठरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
         नोटाबंदी, सलग तीन वर्षे दुष्काळ, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकºयांचा जगण्यासाठी कस लागत आहे. नोटाबंदीपासून मोडलेला शेतकरी त्यानंतर आलेला सलग दुष्काळ, बाजारात कवडीमोल मिळणारे भाव, व यावर्षी अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे पार कोलमडला आहे. यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, मुग, उडीद, कापूस, तुर या प्रमुख पिकांची उत्पादकता घटली आहे. त्यातच बाजारात खरीपातील सर्वच पिकांना कवडमोल भाव मिळाल्याने उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले. अशा स्थितीत यावर्षी शेतकºयांच्या नजरा रब्बी हंगामाकडे टिकून असतानाच अवकाळी पावसाने अखेरच्या क्षणी, हरभरा, संत्रा, गहू आदी पिकांना नेस्तनाबूत करून टाकले. त्यातच रब्बीतील प्रमुख पिक असलेल्या हरभºयाचे दरही बाजारात सरासरी ३५०० मिळाल्याने शेतकºयांचे आर्थिक कंबरडे मोडून पडले. या भयावह स्थितीत आता कोरोना विषाणूने शेतकºयांवरील संकट गहिरे करून टाकले आहे. खरिपापाठोपाठ रब्बीतही जबर आर्थिक नुकसान सोसावे लागले असताना आगामी खरीप हंगाम दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. शेतकºयांच्या हातात तुटपुंजा पैसा अडका आहे. दिवसेंदिवस कोरोनामुळे स्थिती बिघडत असल्यामुळे खरीप हंगाम शेतकºयांच्या जगण्याची कसोटी पाहणार ठरणार आहे. खिशात पैसे नसताना शेती उभी करण्यासाठी शेतकºयांना मोठा आर्थिक संघर्ष करावा लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
         खरीप हंगामासाठी प्रशासनाचे नियोजन पण
        आगामी खरीप हंगामासाठी खते व बियाण्यांचे नियोजन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले. परंतु कोरोनाची सद्यस्थिती पाहता लॉक डाऊनची मुदत ३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे खते व बियाणे उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाल्याने आगामी हंगामात शेतकºयांना किती प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होईल, याबाबत आतापासूनच शेतकºयांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
        कोरोनामुळे आर्थिक व्यवहार ठप्प, नोटबंदीची आठवण
       बाजार समित्यांमध्ये मर्यादित आवक असल्याने बंद सदृष्य स्थिती निर्माण झाली. कापूस खरेदी बंद असल्याने अनेक शेतकºयांचा कापूस घरात पडून आहे. त्यामुळे शेतक?्यांचे व्यवहार ठप्प झाले. सध्या शेतकरी मशागतीच्या कामाला लागला असला तरी भाडे व मजुरी देताना शेतक?्यांना अडचणी येत आहे. कोरोनामुळे निर्माण झालेल्या अडचणींमुळे पुन्हा नोटा बंदीची आठवण ग्रामीण भागात होत असून आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याचे चित्र दिसत आहे.                        











         




 





 


No comments:

Post a Comment