Saturday, April 11, 2020

चिंता, भीतीने अनेकांना निद्रानाशाचा त्रास



लॉकडाऊनचा परिणाम सकारात्मक विचार, संवाद, छंद जोपासण्याचा डॉक्टरांचा सल्ला
 देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
        लॉकडाऊनमुळे अचानक बदललेली जीवनशैली तसेच या परिस्थितीशी जुळवून घेताना होणारी मनाची घालमेल. यातून काहींना निद्रानाशाचा त्रास सुरू झाल्याच्या चित्र मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत. तसेच घरात जुळवून घेताना अनेकांना अडचणी येत आहे. यातून चिडचिड होत आहे. तर काहींच्या मनात भविष्यात चिंता, आजाराची भीती आहे. या समस्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहे.
      कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याची मुदत येत्या १४ एप्रिल अखेर आहे; मात्र ज्याप्रकारे देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. ते पाहता हा कालावधी दि.३० एप्रिल पर्यंत वाढविण्यात आला आहे. या सगळ्या गदारोळात नेहमीच्या जीवनशैलीविरुद्ध जीवनशैलीत राहताना अनेकांना अडचणी येत आहे. तर घरात राहिल्याने चिडचिड होत असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दैनंदिन कामात मन गुंतत असते; मात्र केवळ आराम करणे, एकाच जागी बसून रहाणे, एकच जागी असल्याने भूक मंदावणे, किंवा जास्त भूक लागणे, किरकोळ कारणावरून घरात चिडचिड होणे, पुढे काय होणार? याची सतत चिंता लागून रहाणे, सातत्याने कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून नकारात्मकता येणे अशी अनेक कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मक विचार करावा असा सल्ला दिला जात आहे.
       नागरिकांनी सकारात्मक विचार अन` छंद जोपासावे...
       कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाला असून ही परिस्थिती अभूतपूर्व आहे. तब्बल ३६ दिवस सर्व बंद असल्याने नोकरी, व्यवसाय ठप्प झाला आहे. यानंतर सर्व सुरळीत न झाल्यास अनेकांच्या नोकरीच्या समस्या उद्भवतील. त्यामुळे भविष्याची चिंता, कोरोना आजाराची भीती, घरातील दडपण आणि सोशल मीडियाचा अतिरिक्त वापर, या सर्वांमुळे निद्रानाश होत आहे. देशावर हे संकट जरी असले तरी याचा संधी म्हणून वापर करत देऊळगावकरांनी या काळात आपले नाते संबंध सुधारण्याचा प्रयत्न करावा, सकारात्मक विचार, छंद जोपासावे. - डॉ.आसमा शाहिन, वैद्यकीय अधिकक्षक देऊळगावराजा  

   काय करावे                                  
 * एकमेकांमधील गुण शोधा
 * मनात सकारात्मक विचार आणण्याचा प्रयत्न करा 
 * आपले छंद जोपासाा 
 * सोशल मीडियाचा वापर व्हिडिओ कॉलसाठी करा
    काय टाळावे
 * एकमेकांमधील चुका काढणे टाळा, वाईट बोलू नका.
 * चिडचिड करू नका.
 * सोशल मीडियाचा अनावश्यक वापर टाळा.
 * भविष्याची चिंता करू नका.
     
                   





 















         




 





 


No comments:

Post a Comment