Sunday, April 12, 2020

कोरोनाच्या संकटात विजे साठी धावणारा वायरमन दुर्लक्षित



लॉकडाऊननच्या काळात वीज सुरू ठेवण्यासाठी सेवेत
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
     कोरोनावर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कर्मचारी, आपआपली जाबाबदारी पार पाडत आहे. परंतु या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून आणि पडद्यामागे राहून काम करणारा वायरमेन मात्र आजही दुर्लक्षित राहिला आहे. विजी खूप अत्यावश्यक सेवा असून माणसाला सध्या क्षणाक्षणाला विजेची आवश्यकता भासते. 
       माणसाला अन्न वस्त्र व निवारा हे तीन मूलभूत गरज असते याद आता विजेची गरज सर्वांची मूलभूत गरज बनली आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू आहे तसेच घरीच थांबवा लागते त्याच्याही लॉकडाऊन सुरू आहे. तर घरी पंखे, कुलर, फ्रीज, टीव्ही, इत्यादी वस्तू लागते नागरिकांना बऱ्यापैकी घरात राहता यावे प्रत्येकीचे घर प्रकाशाने उजळून निघाव, जनतेला अखंडित विद्युत पुरवठा मिळत राहावा यासाठी अत्यावश्यक सेवेत राहून सुद्धा कोणाचे नजरेत न पडणारा वायरमेन व त्यांचे सहकारी कोरोनाच्या संकटातही अहोरात्र काम करून देवदूताची भूमिका व्यवस्थित पार पडत असूनही ते दुर्लक्षितच राहिले आहे. कोरोना वर मात करण्यासाठी डॉक्टर, नर्सेस, पोलीस बांधव, सफाई कर्मचारी असून त्यांना केंद्राने मदत जाहीर केली आहे परंतु दिवसरात्र जीव धोक्यात घालणाऱ्या वायरमेन मात्र तर दुर्लक्षितच राहिला आहे.  ग्राहकांच्या सेवेत तत्पर राहून अगदी रात्री-बेरात्री सुद्धा हेच वीज कर्मचारी काम करीत असतात. लोक सण उत्सव आनंदाने साजरे करतात परंतु वीजपुरवठा काही दोष निर्माण झाल्यास या वीज कर्मचाऱ्यांना सण असून सुद्धा स्वतःच्या घरी थांब येत नाही. कोरोना मुळे संपूर्ण देशात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे आज प्रत्येक नागरिक आपापल्या घरी कोणी टीव्ही पाहून टाईमपास करीत आहे तर कोणी झोपा कडून इत्यादी अनेक प्रकारे आपण आज घरी राहून टाईमपास करीत आहोत परंतु विचार करा अर्ध्यातासा साठी ही वीज पुरवठा खंडित झाला तर आपल्या घरात गुदमरल्या सारखे वाटते वायरमेन व त्यांच्या सहकार्यामुळेच आज आपण घरी थांबून कोरोनाशी दोन हात करीत आहो ते कुठेही वीज पुरवठा खंडित ना हुव घेता सुरळीत वीज पुरवठा सुरू ठेवत आहे त्यामुळे शासनाने त्यांनाही सुरक्षाकवच किंवा जास्त वेतन वाढवून त्यांना प्रोत्साहित करायला पाहिजे अशी मागणी ग्राहकांच्या वतीने होत आहे.

No comments:

Post a Comment