कंत्राटी डॉक्टर, सफाई कर्मचा?्यांची तत्काळ भरती, कोरोना प्रतिबंधासाठी निधी कमी पडू देणार नाही...
देऊळगावराजा : अशरफ पटेल
जिल्ह्यामधील कोरोनाची वाढती संख्या बघता कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना चांगली सुविधा मिळावी. यासाठी जिल्ह्यातील शेगाव, खामगाव व देऊळगावराजा या तीन ठिकाणी प्रत्येकी २० - २० बेडचे सर्व सोयींनीयुक्त कोरोना रुग्णालयाची स्थापना करण्याचे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीदरम्यान जिल्हा प्रशासनाला दिले आहे.
या बैठकीला जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी ते म्हणाले की, कोरोनाच्या प्रतिबंधासाठी निधीची मुळीच कमतरता नाही. शेगाव, खामगाव व देऊळगावराजा येथील कोरोना बाधित व संशयित रुग्णांना पुढील उपचारासाठी बुलडाणा येथे आणण्यात येते. त्यामुळे यंत्रणेवर मोठ्याप्रमाणावर ताण येत असल्याने या तीनही ठिकाणी कोरोना रुग्णालय स्थापन करण्यात यावे. या रुग्णालयासाठी प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात येत असून याकरिता लागणाºया अतिरिक्त डॉक्टर्स व सफाई कर्मचाºयांची कंत्राटी पध्दतीने तात्काळ भरती करण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. कोरोनाच्या या लढयात जे आरोग्य कर्मचारी, अधिकारी लढत आहे त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी जिल्ह्यात औषधी, मास्क व स्रस्री किट्स देखील उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.


No comments:
Post a Comment