देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सर्वत्र शासनाच्या वतीने संचारबंदी करण्यात आली आहे. संचारबंदी ठेवण्यात आल्याने दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे बाबासाहेबांच्या प्रत्येक अनुयायांनी घरी राहून प्रत्येकासाठी आदर्श अशी साजरी करावी असे आवाहन राष्ट्रवादी पक्षाच्या नगरसेविका तथा न.प.गटनेत्या सौ.सुनिता गणेश सवडे यांनी केले आहे.
कोरोना या जीवाणूला हद्दपार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. सरकारला जनतेने आवश्यक वेळी सहकार्य करण्याची गरज आहे. एवढीच रास्त अपेक्षा सरकार जनतेला करत आहे. मंगळवारी दि.१४ एप्रिल रोजी होणाºया भीमजयंतीच्या अनुषंगाने केले आहे. दरवर्षी स्थानिक डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आणि शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रम आणि भव्य शोभायात्रेने आयोजन करण्यात येते. परंतु यावर्षी कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहून प्रत्येकासाठी आदर्श ठरेल अशा पद्धतीने भीमजयंती साजरी तसेच आपल्या घरीच रहा सुरक्षित रहा असे आवाहन सौ.सुनिता सवडे यांनी केले आहे.



No comments:
Post a Comment