Tuesday, April 14, 2020

सर्व्हेक्षण करणाºया कर्मचाºयांसाठी ८०० सुरक्षा किटचे वाटप .

स्वत: ना.डॉ राजेंद्र शिंगणे यांनी उपलब्ध करून दिल्या ८०० सुरक्षा किट.
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
            सध्या कोरोनविरुद्ध सुरू असलेल्या या लढाईत अनेक घटक काम करत आहेत. जे रुग्णालयात काम करत आहेत त्यांना शासनाकडून सुरक्षा किट, मास्क याचा पुरवठा करण्यात येत आहे. परंतु ग्राऊंड लेव्हलला काम करणाºया आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका यांना कुठलीच सुरक्षा नसल्याने देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यातील या सैनिकांसाठी या मतदार संघाचे आमदार या नात्याने ना डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी स्वत: ८०० सुरक्षा किट उपलब्ध करून त्याचे वाटप केले आहे. 
       जगभर धुमाकूळ घालणाºया कोरोनाचे बुलढाणा जिल्ह्यातील ७ तालुक्यात २१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे. याचीच गंभीर दखल घेत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री ना डॉ राजेंद्रजी शिंगणे यांनी कोरोनाग्रस्त तालुक्यांचा दौरा करून कोरोनाच्या या लढाईत प्रशासनाची नेमकी काय तयारी आहे याचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी ग्राऊंडलेवलला काम करणाºया आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्या सुरक्षितेसंदर्भात माहिती घेतली असता हे सर्वजण आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वेक्षणाचे काम करत असल्याची बाब मंत्री महोदयांच्या निर्दशनास आली. कोरोनाच्या या लढाईत महत्वाची भूमिका राबवत असलेल्या या सैनिकांची सुरक्षा महत्वाची असल्याने त्यांना सुरक्षाकीट देण्याचा निर्णय मंत्री महोदयांनी घेतला. त्यानुसार सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार या नात्याने त्यांनी सिंदखेडराजा व देऊळगावराजा तालुक्यातील आरोग्य कर्मचारी आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांच्याकरिता स्वत: जवळपास ८०० सुरक्षा किट उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये  रेनकोटसारखा एक पूर्ण ड्रेस, हॅन्डग्लोज, चष्मा आणि टोपीचा समावेश आहे. या सुरक्षा किटचे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाºयांच्या हस्ते आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, पोलीस कर्मचारी यांना वाटप करण्यात आले आहे. या सुरक्षा किटमुळे ग्राऊंड लेव्हलला काम करणाºया या कर्मचाºयांना सुरक्षतेची हमी निर्माण झाल्याने आता हे कर्मचारी कोरोनाच्या या लढाईत निर्भीडपणे काम करण्यास सज्ज झाल्याचं दिसून येते. जर इतर ही तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारे त्यांच्या तालुक्यातील या सैनिकांना सुरक्षा किट उपलब्ध करून दिल्यास या लढाईला अजून बळकटपणा येईल यात शंका नाही.

           


  

    




   


No comments:

Post a Comment