कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सामाजिक दातृत्वातून राजीव सिरसाट घेतला पुढाकार, अन्य नागरिकांसाठी ठरणार प्रेरणादायी
देऊळगावराजा : (अशरफ पटेल)
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजीव सिरसाट यांच्या वतीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २१०० रुपयांची मदतीचा धनादेश तहसीलदार डॉ.सारीका भगत यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.
राज्यासह संपूर्ण देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. लॉक डाऊनची घोषणा केल्यानंतरही राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढतच आहे. या महामारी पासून राज्याला वाचवण्याचे सर्वंकष प्रयत्न करण्यात येत आहेत. उद्योगपती, व्यावसायीक, सेलेब्रिटी, राजकारणी, सामाजिक संस्था, सर्व क्षेत्रातून कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी मोठी आर्थिक मदत उभी केली जात आहे. राजीव सिरसाट यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्त साधून समाजिक बांधिलकी जोपसता कोरोना प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये तब्बल २१०० रुपयांची मदत केली आहे. याप्रसंगी राष्ट्रवादी पक्षाचे तालुकाध्यक्ष राजीव सिरसाट म्हणाले की, राज्यावर आलेल्या या अभूतपूर्व आपत्तीत सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. कोरोना विरुद्धची लढाई आपल्याला संघटितपणे लढायची व जिंकायची आहे. कोरोना विषाणू विरुद्धच्या लढाईसाठी सामाजिक बांधिलकीने सरकारला मदत करीत आहोत. ही लढाई आपण नक्की जिंकू असा विश्वास व्यक्त केला. मदतीचे आवाहन करण्यात आले. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी सामाजिक दातृत्वातून राजीव सिरसाट घेतला पुढाकार, अन्य नागरिकांसाठी ठरणार प्रेरणादायी ठरणार असे मत तहसीलदार डॉ.सारीका भगत यांनी व्यक्त केले. यावेळी गणेश बुरकुल, सदाशिव मुंढे आदी उपस्थित होते.


No comments:
Post a Comment