मतदार संघात कोविड रुग्णालयाची उभारणी
देऊळगाव राजा : सुषमा राऊत
स्थानिक ग्रामीण रुग्णालयात २० खाटांचे ऑक्सिजन व व्हेंटिलेटर सोयीयुक्त कोविड रुग्णालय तयार करण्यात आले असून आज या कोविड रुग्णालयाचे इ उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
देऊळगाव राजा येथे अद्यावत असं शासकीय रुग्णालय असावं असं माझं स्वप्न होत. त्यामुळेच मला येथील रुग्णालय परिपूर्ण रुग्णालय बनवायचे आहे. याठिकाणी सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात दिला आहे. दि.१० ऑगस्ट रोजी बुलढाणा येथे टाटा ट्रस्ट देण्यात आलेल्या निधीतून २०० खटाचे कोविड रुग्णयलयाचे उदघाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे या वेळीराज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, आरोग्य मंत्री राजेशजी टोपे, पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. काही दिवसापासून सिंदखेडराजा मतदार संघात अनेक जण कोरोना बाधित झाले काही रुग्णांनी आपले जीव गमावले मतदार संघात रुग्णांना सुविधा मिळावी या करिता जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी प्रयत्न करून देऊळगाव राजा येथील ग्रामीण रुग्णालयात बंद पडलेल्या ट्रमा केअर सेंटर मध्ये समर्पित कोविड सेंटरची उभारणी करून २० खाटाचे सुविधा युक्त करण्यासाठी अहोरात्र बांधकाम विभागाचे अभियंता काळवागे, शासकीय कंत्राटदार गणेश सवडे यांनी या कोविड सेंटर ला रुग्णाच्या सेवेत दिला आहे. तसेच पालकमंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांना काही अडचणी असतील तर मला तात्काळ कळवाव्यात, मला कुठलीही हयगय केलेली चालणार नाही, अश्या सूचना दिल्या.




No comments:
Post a Comment