Sunday, August 9, 2020

शासकीय निमंत्रण पत्रिकेत माजी आ.डॉ.खेडेकर आणि नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे चे नाव गायब

 राजकीय चर्चेला उधाण , 

देऊळगाव राजा : सुषमा राऊत

         बुलडाणा येथील १०० बेडचे स्त्री रुग्णालय तथा अद्ययावत कोविड सेंटर व देऊळगावराजा येथील ट्रामा केअर सेंटर इमारत व कोविड सेंटरचा लोकार्पण सोहळा आज १० ऑगस्ट रोजी पार पडणार आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या रुग्णालयाचे लोकार्पण करणार आहेत . परंतु या कार्यक्रम पत्रिकेत देऊळगाव राजाच्या नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे यांचे नाव नसल्याने वेगळ्या राजकीय चर्चेला उधाण आले आहे . बुलडाण्याच्या नगराध्यक्षा नजमुन्नीसा मो . सज्जाद यांचे नाव निमंत्रण पत्रिकेत आहे . मात्र देऊळगाव राजा नगराध्यक्षांचे नाव कुणाच्या सांगण्यावरून वगळले , असा सवाल करत नगराध्यक्षा सुनीता शिंदे यांनी केलेले विकासकाम हे आज च्या सत्तेतल्या मंडळींच्या डोळ्यात खुपते आहे का असा  प्रश्न ही काही भाजपा च्या मंडळीने केला आहे , देऊळगावराजा नगराध्यक्षा सुनीताताई शिंदे यांचे नाव वगळण्यात आल्या मूळे राजकीय चर्चेला उधाण आले असल्याचे दिसत आहे ,


       सुनीताताई शिंदे ह्या देऊळगावराजा येथील नगराध्यक्षा असून त्या नात्याने शासनाने त्यांचा मान सम्मान केला पाहिजे त्यांचा नाव निमंत्रण पत्रिकेत छापायला हवा व त्यांना रीतसर निमंत्रण देऊन आयोजित कार्यक्रमात बोलवायला हवे मी अजून ती निमंत्रण पत्रिका बघितली नाही ,

आकाश फुंडकर , भाजपा आमदार खामगाव , 

      मी गेल्या पाच वर्षा पासून या विधानसभा मतदार संघाचा आमदार होतो आणि मतदार संघात कोविड रुग्णल्यासाठी मागणी केली होती. मात्र मलाच या कार्यक्रमाच्या शासकीय निमंत्रण पत्रिकेतून डावलण्यात आले आहे विशेष म्हणजे माझ्या  पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते येथील कोविड सेंटर चे उदघाटन होत आहे परंतु हे कसले राजकारण आहे , हे न समजण्या पलीकडे आहे ,

         माजी आ. डॉ. शशीकांत खेडेकर ,

No comments:

Post a Comment