Sunday, August 9, 2020

अखेर शासकीय निमंत्रण पत्रिकेत नगराध्यक्षचे नाव, परंतु माजी आ.डॉ.खेडेकर यांचा नावाचा विचार नाही

 साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसच्या बातमी चा दणका

देऊळगाव राजा : सुषमा राऊत

    आज मुख्यमंत्री यांच्या हस्ते बुलडाणा आणि देऊळगाव राजा येथील कोविड सेंटर चा लोकार्पण सोहळा होणार आहे. या लोकार्पण सोहळ्या साठी शासकीय पत्रिका तयार करण्यात आली परंतु या पत्रिकेत देऊळगाव राजा येथील नगराध्यक्षचे नाव वागळण्यात आले होते. परंतु साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेसची बातमी प्रकाशित होताच नवीन पत्रिका तयार करून नाव टाकण्यात आले.

     पत्रिकेत देऊळगाव राजा नगराध्यक्ष सौ.सुनीता शिंदे यांचे नाव नसल्याने भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मध्ये नाराजी आली होती. हा भेदभाव असल्याचे भाजपा कडून करण्यात आले होते. हिच नाराजी साप्ताहिक मातृतीर्थ एक्सप्रेस ने जनते समोर आणली आणि काहीच वेळेत नवीन पत्रिका तयार करून नगराध्यक्षचे नाव टाकण्यात आले परंतु माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांचा नावाचा विचार करण्यात आला नसल्याने महाविकास आघाडी च्या घटक शिवसेने च्या पदाधिकारी व कार्यकर्ता मध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment