धनगर समाज एस. टी आरक्षण साठी केले जाणार रक्तलिखित आंदोलन
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
धनगर समाज आरक्षण, धनगर प्रश्न ,धनगर समस्या, या गोष्टीकडे कोणी गांभीर्याने पाहत नाही. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ राजकारणासाठी व स्वार्थासाठी समाजाचा समाजातील काही लोक व राजकीय पक्ष केवळ निवडणूकी पुरता वापर करत आहे, समाजाच्या मूळ प्रश्नावर कोणी बोलायला तयार नाही प्रत्येक राजकीय पक्ष निवडणुका आल्या की धनगर समाजाला प्रलोभने देऊन राजकीय सत्ता मिळवतात मात्र निवडणुका संपल्या की त्यांना धनगर समाजाच्या प्रश्नांचा विसर पडतो त्यामुळे आता धनगर समाजातील युवक आक्रमक झाली आहे त्यामुळे त्यांनी ' देता कि जाता हा' नारा देऊन रक्त लिखित आंदोलनाचा मार्ग उभारला आहे.
धनगर समाजास एक हजार कोटी ची तरदुत ताबडतोब करावी, मेंढपाळ व्यावसायिकांवर होणारे हल्ले थांबवून त्यांना संरक्षण द्यावे व धनगर समाजास एस. टी आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणी साठी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करून १३ ऑगस्ट देऊळगाव राजा तहसील कार्यालयामध्ये धनगर ऐक्य अभियानांतर्गत रक्त लिखित मागण्यांचे निवेदन सादर केले . धनगर समाजास एसटी आरक्षण अत्यंत आवश्यक असतानाही, फक्त राजकीय पक्षाच्या उदासीनतेमुळे अद्याप धनगर समाज त्यापासून वंचित आहे. निवडणुकीच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पक्षाने याबाबत फक्त आश्वासने दिली आहेत. मात्र या ही मागणी अद्यापही लागू केली गेली नाही. धनगर समाजाचा पारंपरिक व्यवसाय हा मेंढी पालन आहे. परंतु मेंढपाळांना अत्यंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे. चराई क्षेत्र उपलब्ध नसणे, मेंढपाळांवर वारंवार होणारे हल्ले, वन विभागाकडून केली जाणारी दडपशाही यामुळे हा व्यवसाय अत्यंत संकटात आलेला आहे. यासाठी मेंढपाळ व्यावसायिकांना हिस्त्र पशु व गाव गुंडापासून संरक्षणार्थ शस्त्र परवाने देण्यात यावे. महायुतीच्या सरकारने धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या एक हजार कोटीची ताबडतोब तरतूद करावी अन्यथा धनगर समाजातील युवक आक्रमक भूमिका घेणार असल्याच यावेळी निवेदनात सांगितले यावेळी सुनील मतकर, रामदास गुरव,भगवान बोंबले, अशोक कांबळे, भगवान जोशी, नितीन बकाल, ज्ञानेश्वर सोनसळे, राजू गाठोळे, गणेशसरोदे यांच्यासह अनेक युवक उपस्थितीत होते.


No comments:
Post a Comment