शिवसंग्राम संघटनेची तहसीलदारांकडे मागणी
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
राज्यासह देऊळगाव राजा तालुक्यात मागील पंधरा दिवसापासून सतत पाऊस सुरू असून पावसामुळे ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.तालुक्यात सर्वत्र शेतकरी या परिस्थितीने संकटात सापडला आहे. हातातोंडाशी आलेले मूग, सियाबीन कपाशी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सरकारने विशेष बाब म्हणून कोणतेही निकष न लावता केवळ शेतकरी अडचणीत आहे,याचा विचार करून देऊळगाव राजा तालुका ओला दुष्काळ जाहिर करावा,व तात्काळ शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालूका अध्यक्ष राजेश इंगळे यांनी तहसीलदार डॉ.सारिका भगत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार डॉ.सारिका भागत यांची भेट घेऊन ओल्या दुष्कळा बाबत निवेदन दिले. यावेळी त्यांनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली.मागील पंधरा दिवसापासून तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने नैसर्गिक आपत्ती निर्माण झाली आहे.हे मान्य करून शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. पंचनामे करण्याची औपचारिकता न करता केवळ पीक नोंदी पाहून शेतकऱ्यांना सरसगट नुकसानभरपाई देण्यात यावी.तालुक्यात अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेली खरिपातील सोयाबीन, मूग, कपाशी, मिरची, मका आदी पिके मातीत गेली आहेत.शेतकऱ्यांचे व शेतीचे फार मोठे नुकसान झाले आहेत. शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहेत. यातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, जहीर पठाण, ज्ञानेश्वर शिंदे, अजमत पठाण, संतोष हिवाळे, विनायक अनपट, चंद्रभान झिने आदींनी केली आहे.




El Royale - Casino, Hotels & Resorts - MapYRO
ReplyDeleteBest El Royale Hotels & Resorts · Fairfield Inn & Suites by Marriott 양주 출장안마 Grand 양산 출장마사지 Opening · Holiday Inn Suites by 충주 출장샵 Wyndham Philadelphia, PA · 김제 출장마사지 Fairfield Inn by Wyndham 원주 출장샵