Saturday, May 29, 2021

हॉलीबॉलपटू शेख अफसर यांना श्रद्धांजली


  श्री.बालाजी क्रीडा मंडळाने घेतला पुढाकार


देऊळगाव राजा : प्रतिनिधी
       मागील आठवड्यात अंचरवाडी फाट्यानजीक झालेल्या दुचाकी अपघातात मृत्यू झालेले बस चालक तथा हॉलीबॉलपटू शेख अफसर हाजी शेख आलम यांना श्री बालाजी क्रीडा मंडळाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी क्रीडा रसिक व शुटींग बॉल खेळाडूंनी आपल्या भावना व्यक्त केल्या
       स्थानिक नगर परिषद उर्दु शाळेच्या प्रांगणात आयोजित श्रद्धांजली सभेच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हॉलीबॉलपटू हाजी शमशेर खान पठाण होते यावेळी आपले सहकारी  हॉलीबॉल पटू शेख अफसर यांच्या अपघाती निधनामुळे त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना सर्वजण भावुक झाले शेख अफसर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली याप्रसंगी ज्येष्ठ शुटींगबॉल पटू श्री पठाण सर, तुल्ले सर, विजय देवउपाध्ये, यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिवंगत सहकार्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या कार्यक्रमाचे संचालन श्री गवई सर यांनी केले. याप्रसंगी हॉलीबॉल पटू राजेंद्र पाटील, फयाज खान, फिरोज खान पठाण, श्री.भोयर,जयसिंग दादा, श्री खैरे, गजानन लांडगे, एजाज कोटकर, जाहीर भाई, किरण कसापुरे, नितीन सोळंके, नंदू लोखंडे, अकिल खान, आदी क्रीडाप्रेमी शूटिंगबॉल खेळाडू उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment