Wednesday, October 6, 2021

महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र आणि देशाची शान आहेत : ना.डॉ. शिंगणे


 मातृतीर्थ तालुका पत्रकार संघाच्या वतीने आयोजित गड किल्ले बनविणे भव्य  खुली स्पर्धा बक्षीस वितरण सोहळा

देऊळगाव राजा : प्रतिनिधी

      सिंधुदुर्ग, विजयदुर्ग व जंजिरा हे अरबी समुद्राला लागून असलेले किल्ले/जलदुर्ग आहेत. ते समुद्रमार्गे होणाऱ्या शत्रूंच्या हल्ल्यापासून स्वराज्याचे रक्षण करत होते. महाराष्ट्रातील हे सर्व किल्ले महाराष्ट्र आणि देशाची शान आहेत. असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांनी मातृतीर्थ तालूका पत्रकार संघ द्वारा आयोजित गडकिल्ले बनविने खुली स्पर्धा चे बक्षीस वितरण सोहळयास केले. 


        स्थानिक अग्रसेन भावनात ५ ऑक्टोबर रोजी मातृतीर्थ तालूका पत्रकार संघ द्वारा आयोजित गडकिल्ले बनविने खुली स्पर्धा चे बक्षीस वितरण सोहळयाचे अध्यक्ष स्थानी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. राजेंद्रजी शिंगणे होते. या स्पर्धेचे संयोजक व प्रमुख पाहुने म्हणून बालाजी नगरीचे प्रथम नागरिक सौ. सुनिता रामदास शिंदे, जि.प. बांधकाम सभापती रियाज खान पठाण, जि.प.विरोधी पक्ष नेते मनोज कायंदे, बालाजी संस्थानचे विश्वस्त राजे विजयसिंग जाधव उपस्थित होते. कार्यकर्माच्या सुरूवातीत आराध्य दैवत बालाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मातृतीर्थ तालूका पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सुषमा राऊत यांनी घेण्यात आलेल्या उपकर्माची माहिती दिली. प्रथम क्रमांक शिवानी निरफळे,  दुतिय क्रमांक अगस्त्य तिडके, तृतीय क्रमांक सार्थक गाडगे आणि आचल कव्हळे प्रोत्साहनपर बक्षीस आदित्य शिंदे यांनी पटकावलेला आहे. त्या सर्व विजेता ना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे व मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच 




उर्वरित स्पर्धकांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. पुढे बोलताना ना.डॉ. शिंगणे म्हणाले की, महाराष्ट्रात आहेत तसे आणि तितके किल्ले जगात अन्यत्र नाहीतच. गड किल्ले बनविण्याची खुली स्पर्धा ठेवून मातृतीर्थ तालूका पत्रकार संघा ने मुलां मधे महाराष्ट्राची शान असलेले गडकिल्ल्या बद्दल नवीन चेतना निर्माण केली आहे. त्यांचे घेण्यात आलेल्या उपक्रमाला खूप खूप शुभेच्छा प्रा. जयभाये, पठान, शिंदे, कायंदे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी राजकीय, व्यापारी, शिक्षक, पत्रकार आधी उपस्थित होते. तर मान्यवरांचा सत्कार  संस्थापक अध्यक्ष सुषमा राउत  व संघाचे अध्यक्ष अशरफ पटेल यांनी केला. परीक्षक म्हणून  प्रा.रमेश गवई, प्रा. मधुकर जाधव, प्रा.डॉ. किरण जायभाये  यांनी निपक्षपणे काम पाहीले ., कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन कुमार आंधळे यांनी केले तर आभार पत्रकार सुरज गुप्त यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी मातृतीर्थ तालूका  पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम केले.

No comments:

Post a Comment