Friday, October 8, 2021

खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी पाराजी खांडेभराड यांची नियुक्ती


 देऊळगावराजा : (प्रतीनीधी)  

    गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहिर झाली होती. दि.८ आॅक्टोंबर रोजी घेण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे विश्वासू आणि निष्ष्ठवान कार्यकर्ते पाराजी खांडेभराड यांची खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

     गेल्या आठ महिन्यापासून रिक्त असलेल्या येथील तालुका खरेदी विक्री सहकारी संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष व.द.वानखेड़े  यांचे ९ एप्रिल रोजी कोरोना मुळे निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष पद रिक्त होते व कोरोना काळ ओसरत असल्याने प्रशासनाने खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदाची निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याबाबत चर्चा सुरु होती. या पंचवार्षिकेत अनिल रामाणे तर मागील काळात विठ्ठलराव मगर यांनी धुरा संभाळली. अनिल रामाणे यांना अढीच वर्ष तर विठ्ठलराव मगर यांनी दोन वेळेस अध्यक्षपद भुषविले असल्याने या दोघांचा क्लेम संपला आहे. चालु पंचवार्षिक काळात तत्कालीन अध्यक्ष वानखेडे व शेळके दोघांचे निधन झाले असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते पाराजी खांडेभराड यांना खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी विनविरेध निवड करण्यात आली. त्यांच्या अध्यक्षपदाची नियुकत्ी बद्दल सर्वत्र जल्लोेष साजरा करण्यात येत आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष तुकाराम खांडेभराड, विधानसभा अध्यक्ष गजानन पवार, माजी नगराध्यक्ष संतोष खांडेभराड, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष राजीव सिरसाठ, खविसं चे माजी अध्यक्ष अनिल रामाणे, शहरध्यक्ष अर्पित मिनासे, गजेंद्र शिंगणे, गणेश बुरकुल, एल.एम.शिंगणे, खविसं चे सर्व सदस्य आदी राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   

   

No comments:

Post a Comment