देऊळगावराजा : (प्रतीनीधी)
राज्यात कोरोनाला हद्दपार करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने " मिशन कवच कुंडल अभियान दि. ८ आॅक्टोबर ते १४ आॅक्टोंबर पर्यंत अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून दररोज 15 लाख नागरिकांना कोरोनाची लस देण्याचे नियोजन करण्यात आले असून या अभियानात संबंधित अधिकाºयांनी सदर अभियान यशस्वी करण्यासाठी कामाला लागावे व याकरिता शहरी भागात त्या त्या वाडार्चे लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या वॉडार्तील ज्या ज्या नागरिकांनी अद्ध्याप ही कोरोना लसीचा पहिला डोस घेतला नसेल त्यांनी अभियानात सहभागी व्हावे असे आवाहन तहसिलदर शाम धनमने यांनी नगर परिषद मध्ये उपस्थित लोकप्रतिनिधी यांना करून हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली.
राज्यात १०० % कोरोना लसीकरण पूर्ण करून भारतात राज्याला नंबर १ करण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने मिशन कवच कुंडल अभियान दि. ८ आॅक्टोंबर ते १४ आॅक्टोंबर पर्यंत राबविण्यात येत आहे. देऊळगाव राजा शहरात ६५ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असून ही आकडेवारी १०० टक्के पूर्ण करण्यासाठी तालुक्यातील संबंधित प्रमुख यंत्रणा प्रमुखांनी कंबर कसली असून नियोजन करण्यात आले आहे.शहरात २ ठिकाणी लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून १ फिरते पथक स्थापन करण्यात येणार असून यासाठी त्या त्या वॉडार्तील लोक प्रतिनिधी यांची मदत घेण्यात येणार आहे यासाठी दि. ८ आॅक्टोंबर रोजी नगर परिषद सभागृहात लोकप्रतिनिधी यांचे सोबत तहसिलदार यांनी संवाद साधला व हे अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. तर शहरात ठिकठिकाणी लोकसहभागातून प्रसिध्दी साठी फ्लेक्स बोर्ड लावण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलीव नगर परिषद च्या घंटा गाडीद्वारे ध्वनिफीत द्वारे जनजागृती करण्यात येणार आहे.यावेळी नगराध्यक्ष सौ. सुनिता शिंदे. उपनराध्यक्ष प्रवीण झोरे, नगर सेवक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी राजमाने, नगर परिषद चे कर्मचारी सन्मती जैन, गणेश मुळे, राजेंद्र वानखेडे आदि उपस्थित होते.

No comments:
Post a Comment