Friday, October 8, 2021

मोठे साहेब, सहकारमहर्षी स्व.भास्करराव शिंगणे

    वयाच्या १७ व्या वर्षी मोठ्या साहेबांच्या संपर्कात आलो आणि  बनलो  त्यांचा सक्रीय कार्यकर्ता, साहेबांपर्यंत पोचण्याचा रस्ता म्हणजे नाट्यभूषण स्व नाना बोरकर , बोरकर सरांशी माझे भावनिक संबंध, बोरकर  सर माज्यासासाठी आणि  मी बोरकर सरांसाठी जीव की प्राण, असा तो मंतरलेला, भारावलेला काळ ....

          

         रविवारीय पुरवण्यामध्ये माज्या कविता प्रसिद्ध व्हायला लागल्या,मुंगीच्या डोळ्यांत समावेल एवढे प्रसिद्धीचे आकाश विस्तारायला जेमतेम सुरुवात झाली ,बोरकर सरांची ग्रामीण नाट्य चळवळ वेग धरत होती, या चळवळीच्या बिनीच्या शिलेदारांपैकी मी एक, खेड्यापाड्यात नाट्यप्रयोग व्हायचे, उदघाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन माज्याकडे असायचे, एकदा शेंदुर्जन येथे इथे नांदते शिवशाही या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होते,
उदघाटक होते मोठे साहेब, इथेच माझी आणि साहेबांची पहिली भेट,  साहेबांनी बोरकर सरांना आवाज दिला, बोरकर सर साहेबांच्या जवळ येऊन अदबशीर उभे राहिले, साहेबांनी माज्याविषयीची चौकशी केली, बोरकर  सरांनी मला हाक मारली , मी धवातच साहेब आणि बोरकर सर जिथे बसले होते तिथे पोचलो, मोठ्या साहेबांची पहिलीवाहिली शाबासकीची थाप माज्या पाठीवर पडली, राही तुमची मराठी  प्रवाही आणि वाड्मयीन जाण प्रगल्भ आहे, मी अवघडलों, अंगावरून मोरपिस फिरायला लागले, बुलडाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेचा राजीनामा देऊन साहेबांनी नुकतीच राजकीय मैदानात उडी घेतली होती, त्या पहिल्या भेटीतच साहेबांच्या करारी,  बाणेदार, रुबाबदार दृढ निश्चयी व्यक्तिमत्वाने  एवढा प्रभावित झालो की बनलो आयुष्यभरासाठी त्यांचा फुल्ल टाईम कार्यकर्ता,  मोठ्या  साहेबांचे डोळे म्हणजे वाघाचे डोळे, त्या डोळ्यांना डोळे भिडवून  बोलायची कोणाची बिशाद, कोणाची हिंमत, साहेब माज्याशी पूवीर्पासून मोकळेठाकळे, घळपघळ,  हिंमत  झाली नाही की पोक्त वयाची बुजुर्ग माणसे देखील मला  भेटायची, अमुक काम आहे, आमची हिंमत होत नाही,  राही, हे काम साहेबांना तुम्ही सांगू शकता,  असे वाक्य  कानावर पडले की माझी छाती अभिमानाने वीतभर फुगायची, माज्या , माज्या दोन्ही बहिणीच्या लग्नात  मोठे साहेब कुंटुंबासह हजर होते,  आज त्या काळातल्या प्रसंगांची उजळणी करताना सारं सारं लख्खपणे दिसायला लागलं आहे.
          काळाची पावलं झपाट्याने पडत होती, विधानसभा निवडणूक येऊन ठेपली,  साहेब शेतकरी  कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक  रिंगणात उतरले,प्रचाराची रणधुमाळी ऐन भरात आली, माज्याकडे लाऊडस्पीकर असलेली एक गाडी, दिवसभर  साहेबांचा खेड्यापाड्यावर प्रचार,  मध्यरात्रीच्या सुमारास घरी परत, मोहल्ल्यात परतलो की  चोहीकडे पंजा असलेली फलके, माज्या घरावर, माज्या छातीवर साहेबांचं  चिन्ह खटारा गाडी, साहेबांच्या प्रचारसभांचं सूत्रसंचालन, जीव ओतून प्रचार, हा दिनक्रम,  या निवडणूकीत साहेबांचा पराभव झाला,  स्व जे  के खरात विजयी  झाले,माज्यासारख्या।कच्च्या  वयाच्या कार्यकत्यार्ची ती पहिली निवडणूक, आम्ही खचलों,खचतील साहेब कुठले, साहेबांनी नव्याने हिमतीची मोट बांधली,जनसंपर्क  अभियानाला वेग दिला,ज्या गावात मते कमी पडली त्या गावचे अंतरंग जाणून घेतले, राज्यात काही आश्चर्यकारक राजकीय घडामोडी झाल्या, अचानक विधानसभेची मध्यावती निवडणूक लागली, साहेब पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले, चिन्ह तेच खटारा गाडी, पुन्हा तोच  प्रचाराचा  शिरस्ता, पण या खेपेला आम्हा कार्यकर्त्यांच्या डोळ्यांवर मागील निवडणुकीच्या अनुभवाचे चष्मे, घसघशीत  मतांनी साहेबांचा ऐतेहासिक विजय झाला, माझा आनंद गगनात मावेनासा,  आमदार झाल्यावर साहेबांचे सत्कार सोहळे,सत्कार सोहळ्यांचं सूत्रसंचलन माज्याकडे, बदलून गेला माज्या कफल्लक,।भणंग दैनंदिनीचा दीनवाणा चेहरा,।मनात निर्माण झाली गर्भश्रीमंतीची  जाणीव, मोठया साहेबांच्या १०० च्या वर सभा समारंभाचे सुत्रसंचालन मी केले याचा मला सार्थ अभिमान आहे.  हीच माज्या जगण्याची भावनिक रसद, माझं हळवं भावविश्व आहे,मोठे साहेब गेल्यावर एक पोकळी निर्माण होते की काय असे वाटत असताना मोठ्या साहेबांच्या सर्वसमावेशक ,धमार्तीत राजकीय शैलीचे  वारस त्यांचे सुपूत्र मा ना  डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी हा वारसा समर्थपणे पेलला,  सांभाळला,   पहिल्या  निवडणूकीत  मोठे साहेब गेल्याची सहानुभूती होती म्हणून विजय झाला मान्य आहे, पण नंतरच्या ४ निवडणूका म्हणजे  लहान्या साहेबांनी सिद्ध केले आपले विकासात्मक, सर्वसमावेसक नेतृत्व, पाचव्यांदा  लहाने साहेब मातृतीर्थ  सिंदखेडराजा मतदारसंघाचे नेतृत्व करीत आहेत, सर्व जातीधमार्चे मंडळी एकवटली  आहे लहान्या साहेबांच्या  मायाळू कारकिर्दीच्या पंखाखाली, मोठ्या साहेबांचं मंत्री  होण्याचं स्वप्न एक नाही ४ वेळा  राज्यपाल भवनात शपथ घेऊन मा ना डॉ राजेंद्र शिंगणे साहेब यांनी पूर्ण केले, मोठे साहेबांनंतर अनेक राजकीय बदल  घडले, कायम राहिले शिंगणे परिवाराशी माझे निष्ठावलेले नाते, कायम राहिला मोठे  साहेब ते लहाने साहेब माज्या वाणीचा, माज्या सूत्रसंचालनाचा अखंड प्रवास.....
 
 


 

No comments:

Post a Comment