लखीमपूर घटनेवर महाविकास आघाडी आक्रमक; महाराष्ट्र बंद ची हाक..
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
लखीमपूर शेतकरी हत्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देश आणि राज्यातील विरोधक एकवटले आहेत.शेतकऱ्यांना चिरडून मारल्याचा निषेधार्थ येत्या ११ ऑक्टोबरला 'महाराष्ट्र बंद'ची हाक देण्यात आली आहे.त्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असून आता बुलडाणा राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी ही यासाठी सज्ज झाले आहेत. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना या बंद मद्ये सहभागी होण्याचे आवाहन देत राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष एड.नाजेर काजी यांनी भाजपा वर टीका करत भाजपच्या हाती सत्ता आहे म्हणून त्यांच्याकडून होणारा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसत आहे.शांततेच्या मार्गाने निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर भाजप कार्यकर्त्यांनी गाड्या घातल्या आहेत. ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. त्यांना शेतकऱ्यांबद्दल काय आस्था नाही. शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून भाजपा कार्यकर्त्यानी शेतकऱ्यांची हत्या केली आहे.शेतकऱ्यांची हत्या करण्याचा निर्णय घेणाऱ्या या भाजप सरकारचा विरोध करण्यासाठी महाविकास आघाडी व पक्षाचे अध्यक्ष मा.शरद पवार यांनी 'महाराष्ट्र बंद चा निर्णय घेतला ,सदर आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार श्री.शरदचंद्रजी पवार, प्रदेशाध्यक्ष ना.श्री.जयंतराव पाटील यांनी लेखी पत्राद्वारे केले आहे. महाविकास आघाडी तर्फे "महाराष्ट्र बंद" मध्ये शामिल व्हा असे आवाहन ही जिल्हा अध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment