सामाजिक कार्याकर्ते मंगेश तिडके
यांची निवेदनाद्वारे मागणी
देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
गेल्या अनेक वर्षापासून श्री बालाजी महाराजांची पुण्यनगरी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. मुख्य अधिकारी अरुण मोकळ यांनी शहर स्वच्छ, सुंदर बनवण्यासाठी नवीन झालेल्या अतिक्रमणे काढली परंतु अनेक वर्षापासून झालेले अतिक्रमण काढण्यात आली नाही याकरिता सामाजिक कार्यकर्ते मंगेश तिडके यांनी दि.२५ फेब्रुवारी रोजी अतिक्रमण हटविण्यासाठी लेखी निवेदनाद्वारे मागणी करुन आंदोलनाचा इशारा दिला होता. परंतु न.प.प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण हटवण्यासाठी कोणतीच दखल घेण्यात आली नसल्याने स्थानिक नगरपालिका समोर दि.२१ मार्च पासून उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे.
श्री बालाजी महाराजांचे पुण्यनगरी सुदंर ठेवण्यासाठी नगर पालिका प्रशसना कडून नविन योजनेत शहराचा विकास करण्यात येत आहे. परंतु फुटपाथवरील अतिक्रमणाबाबत नगर पालिका प्रशासन व बांधकाम विभाग उदासिन दिसत आहे. फुटपाथवर पहिला अधिकार नागरिकांचा आहे, त्यानंतर फुटपाथवरच्या अवैध बांधकामांवर पालिकेने कोणतीच कारवाई केली नाही बस स्थानक चौकात फुटपाथवर बांधकाम करुन दुकाने थाटण्यात येत आहे. तसेच सिविल कॉलनी कडे जाणाऱ्या रस्त्यावर अतिक्रमणे केल्यामुळे रहदारी साठी अनेक अडथळे निर्माण होत आहे तर काही ठिकाणी दुकाना समोरील फुटपाथ भाड्याने देण्याचे काम शहरात सुरु आहे. काही अतिक्रमण धारकांनी आपली दुकाने भाड्याने दिली आहे. या अवैध अतिक्रमणा मुळे शहातील मुली व महिलांना छेडखानीचे प्रकार वाढले आहे. आज रोजी बस स्थानक चौक, शाम कॉलोनी, पंचायत समिती परिसर, लिलाव भवन परिसरात, जालना रोडवर अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे वाढत्या अतिक्रमणामुळे फुटपाथ हरवले आहे. अतिक्रमण धारक ही अरेरावीची भाषा करीत असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगर पालिका, महसुल विभाग व बांधकाम विभागाकडून कोणतीच दखल घेण्यात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. हे अतिक्रमण निघेल यावर जनतेचे लक्ष लागले होते. परंतु त्यांच्या हाती निराशा आली शहराला अतिक्रमण मुक्त करण्यासाठी सामाजिक कार्याकर्ते मंगेश तिडके यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांचे उपोषणाला जन समर्थन लाभत आहे. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नागरिकांनी पाठिंबा दिलेला आहे मुख्यधिकारी अरुण मोकळ आणि संबधित विभाग यावर लक्ष देणार का यावर शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. या उपोषणाला पवन झोरे, अरविंद खांडेभराड, धनंजय मोहिते, सुनील शेजुळकर, पवन बोराटे, मोहन खांडेभराड प्रदीप वाघ, हनीफ शाह, आयुब शहा, बाळू शिंगणे आदींनी भेट दिली.


No comments:
Post a Comment