देऊळगावराजा : (प्रतिनिधी)
स्थानिक पोलीस स्टेश्नचे एएसआय आणि व्यंकटेश महाविद्यालयाचे शिपाई आपल्या सेवेतून ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारºयांचा सत्कार राष्ट्रवादी पक्षाच्या माजी न.प.गटनेत्या सौ.सुनिता सवडे व राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे यांनी त्यांच्या निवास्थानी भेट देवून केला.
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने केवळ सत्कार करून निरोप न देता कर्मचाºयांचे ऋण व्यक्त करण्याचा नवा पायंडा सर्व सरकारी विभागात श्रेष्ठ मानला जातो. वेळकाळ न पहाता सरकारी कामकाज करावे लागते. या स्थितीत कुटुंबांकडे पुरेसे लक्ष देता येत नाही. सेवा बजावत कौटुंबिक जबाबदारी पार पाडताना कर्मचाºयांची कसरत होते. पोलिस कर्मचारी असो की शिपाई आपला कर्त्यव्य समजून अहोरात्र सेवा करतात. कर्मचारी सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना सत्कार करून निरोप देण्यात येतो. परंतु आपल्या भागात त्यांचा सन्मान होना खुप महत्वाचे आहे. शहरातील अमृत नगर भागात राहणारे स्थानिक पोलीस स्टेश्नचे एएसआय आनंदा शिराळे आणि व्यंकटेश महाविद्यालयाचे शिपाई रामराव जाधव हे आपल्या सेवेतून ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. दोन्ही कर्मचारी आपल्या भागात राहतात म्हणून त्यांचा सत्कार करुन त्यांना सन्मानित करण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादी पक्षाच्या माजी न.प.गटनेत्या सौ.सुनिता सवडे व राष्ट्रवादी पक्षाचे युवानेते गणेश सवडे यांनी त्यांच्या निवास्थानी भेट देवून सहपत्नीक शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.
दोन्ही कर्मचाºयांनी उत्कृष्ट सेवा दिल्या बद्दल गौरव
दोन्ही कर्मचाºयांनी आपल्या विभागातील कामकाजाचे स्वरूप पहाता आपण अनेक कष्टप्रद काम केली आहेत. अनेकदा कौटुंबिक कार्यक्रम व अन्य वैयक्तिक जबाबदारी पार पाडताना चांगलीच कसरत करावी लागली असेल. अनेक कसोटीच्याप्रसंगी भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ या उक्तीप्रमाणे निर्णय घेतले असतील. आज आपण सेवानिवृत्त होत असताना विभागातील उत्कृष्ठ सेवेची आम्हाला जाणीव असून त्याबद्दल आम्ही आपले ऋण व्यक्त करीत आहे.
सौ.सुनिता गणेश सवडे, राष्ट्रवादी माजी गटनेत्या न.प. देऊळगावराजा


No comments:
Post a Comment