गुप्ता परिवाराचा गौरव
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
स्थानिक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त मराठी शाळेच्या सेवानिवृत्त मुख्यध्यापिका श्रीमती शारदाबाई शंकरलाल गुप्ता यांच्या हस्ते ध्वजाचे ध्वजारोहण संपन्न झाले यावेळी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे सचिव डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या उपस्थिती त पार पडले अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून यावेळी प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर रामप्रसाद शेळके यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले रेड हाऊस ब्लू हाऊस येलो हाऊस ग्रीन हाऊस यांचे क्रीडांगणावर पथसंंचालन करण्यात आले. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांचे देशभक्ती गीतावर सांस्कृतिक नृत्य करण्यात आले विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर सामूहिक गीत साजर केले. यावेळी पालक वर्गाची मोठी उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सुनीता टेकाळे मॅडम यांनी केले यावेळी उपस्थित माजी सैनिक दत्ता जाधव सुजित गुप्ता,सौ गुप्ता यांच्या सह शाळेतील शिक्षक कर्मचारी उपस्थित होते.



No comments:
Post a Comment