शैक्षणिक गुणवत्ता सेमिनारात माजी मंत्री अझर हुसेन यांचे प्रतिपादन
देऊळगाव राजा : अशरफ पटेल
अल्पसंख्याक समाजाने आपला इतिहास विसरून आपल्या पाल्यांना शैक्षणिक गुणवंत बनविण्या कडे लक्ष द्यावे, प्रगतीशील शिक्षणाच्या नवीन वाटा शोधुन समाजाची शैक्षणिक प्रगती साधावी असे प्रतिपादन माजी मंत्री अझर हुसेन यांनी आमेना अजीज उर्दू हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे आयोजित बरार ए तालिमी कारवा एक दिवसीय सेमिनार च्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना केले.
वऱ्हाड शैक्षणिक समिती म्हणजेच बरार तालिमी कारवा या अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्था चालकांच्या वतीने येथील आमेना अजीज उर्दू हायस्कूल येथे एक दिवसीय प्रगतशील शैक्षणिक सेमिनारचे आयोजन व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. सदर सेमिनारच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री खान म.अझर हुसेन होते. याप्रसंगी व्यासपीठावर माजी सभापती रियाज खा पठाण, कबीर मोहसीन रिसोड, बी.एम पठाण, रियाज सौदागर धाड, अ हफिज खान बुलडाणा, फारूक देशमुख मेरा, राहील शकील अहेमद पिंपळगाव राजा, माजी उपनगराध्यक्ष डॉ इक्बाल कोटकर आदींची उपस्थिती होती. सदर एक दिवसीय सेमिनार मध्ये उपस्थित अकोला बुलढाणा वाशिम येथील शैक्षणिक संस्था चालक मुख्याध्यापक शिक्षक यांना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काझी, मुफती मोहम्मद अशपाक अकोला, गणी गाझी लाखनवाडा, एडवोकेट मजीद कुरेशी मलकापूर, डॉ वकारउल हक खामगाव, इरफान अली दुसरबीड, सरफराज खान अकोला व अबरार फारुकी बडनेर भोलजी यांनी शिक्षणाच्या विविध विषयावर आपले मार्गदर्शन केले. शिक्षणाच्या प्रवाहात उर्दू माध्यमा ची स्थिती विशद करताना शिक्षण विस्तार अधिकारी दादासाहेब मुसदवाले यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.संस्थाचालक हाजी अल्ताफ कोटकर यांनी प्रास्ताविक करताना अल्पसंख्यांक समाजाच्या समस्या पाहता संस्थेने गत २३ वर्षात केलेल्या शैक्षणिक कार्याचा लेखाजोखा मांडला. याप्रसंगी दहावी व बारावी सायन्स च्या गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. पुढे बोलताना माजी मंत्री खान म.अझर हुसेन यांनी बरार तालिमी कारवा ह्या अल्पसंख्यांक समाजात शैक्षणिक चळवळ उभारणीसाठी प्रयत्न करत असलयाचे सांगत, अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना उच्चशिक्षित करण्याच्या दृष्टीने समितीने काय केले पाहिजे याबद्दल च्या महत्त्वपूर्ण सूचना केल्या.सदर कार्यक्रमात गुणवत्तापूर्ण शिक्षणावर पत्रकार गणी गाझी यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.संस्थेचे सचिव हाजी आलम खान कोटकर यांनी उपस्थित तिन्ही जिल्ह्यातील संस्थाचालक मुख्याध्यापक आदींचे आभार व्यक्त केले मुख्याध्यापक शारीक खान यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.



No comments:
Post a Comment