
अन्यथा ७ दिवसात करणार गुन्हा दाखल करणार
देऊळगाव राजा : प्रतिनिधी
संपूर्ण राज्यामध्ये जनावरांचा लंपी चर्मरोगाचा प्रदुभाव मोठ्या प्रमाणावर आढळून आलेला आहे. हा रोग जनावरांमध्ये जलद गतीने पसरणारा अनुसूचित रोग असल्यास दिसून आले आहे. त्यामुळे नगरपरिषदेचे मार्फत संपूर्ण शहरांमध्ये जनावरांचे सर्वेक्षण केले असता काही लोकांनी निवासी क्षेत्रामध्ये विनापरवाना जनावरांची गोठे तयार केलेली आहे असे आढळून आलेले आहे लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भाव निर्माण केलेले जनावरांचे गोठे ७ दिवसाचे आत कायमस्वरूपी बंद करावे आणि जनावरांची गोठ्यांची व्यवस्था शहराचे बाहेर करावी तसेच उघड्यावर मास विक्री बंदिस्त करावी अन्यथा गुन्हा दाखल करणार असे आवाहन उपविभागीय अधिकारी डॉ भूषण अहिरे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळा यांनी पत्रकार परिषद द्वारे केली आहे
जनावरांमध्ये 'लम्पी स्किन' हा त्वचेचा आजार असून, त्याच्या लक्षणांविषयी जनावरांची जीवित हानी टाळण्यासाठी प्रभावी उपचार करण्याची गरज आहे. काही लोकांनी मनमानी करू शहरातील रस्त्यांवर जनावरांची गोठे उभारलेली आहे तसेच मोकाट जनावरे काही लोकांनी सोडण्यात आलेले आहे या लोकांनी आपले जनावर आपल्या ताब्यात घेऊन गावाचे बाहेर ठेवावे अन्यथा त्या भोकर जनावरांना पकडून नगरपालिका मार्फत विक्री करण्यात येणार आहे तसेच काही वर्षापासून जळगाव शहराचे मुख्य ठिकाणी खुल्यामध्ये मास विक्री होत असल्याने नागरिकांना त्रास होत असल्यामुळे त्या सर्व व्यवसाय करांनी आपल्या दुकानाला बंदिस्त करून घेण्यात यावे अन्यथा सात दिवसाचे आत संदर्भीय अधिनियमानुसार दंडात्मक कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे आवाहन डॉ भूषण अहिरे आणि मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी पत्रकार परिषद द्वारे केली आहे.
No comments:
Post a Comment