Friday, September 30, 2022

नैसर्गिक आपत्ती बाधित जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करा


 शिवसंग्रामची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

देऊळगांव राजा : प्रतिनिधी
नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितग्रस्तांना मदत देण्याबाबत निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उप समितीची बैठक संपन्न झाली.ज्या जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.अशा जिल्ह्यांना नुकसानी पोटी शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सदर बैठकीत निर्णय घेण्यात आला.मात्र नैसर्गिक आपत्ती बाधित जिल्ह्यांमधून बुलढाणा जिल्हा वगळण्यात आला आहे.नैसर्गिक आपत्ती बाधित जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा समावेश करून बाधितांना आर्थिक मदत देण्यात यावी,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे.
        शिवसंग्राम संघटनेने तहसीलदारांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आज नैसर्गिक आपत्ती बाबत निवेदन दिले आहे.सदर निवेदनात म्हटले आहे की,मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून उप समितीची बैठक संपन्न झाली.जून ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.विशेष बाब म्हणून सुमारे 755 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय या बैठकीत झाला आहे.राज्यातील अंदाजे पाच लाखापेक्षा अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. मात्र या लाभापासून बुलढाणा जिल्हा वंचित राहणार आहे.कारण नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित जिल्ह्यामध्ये बुलढाणा जिल्ह्याच्या समावेश नाही.यामधून बुलढाणा जिल्ह्याला वगळण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यात ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे आणि मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत मिळणे गरजेचे आहे.निकषा पलीकडे जाऊन बुलढाणा जिल्ह्याला जास्तीत जास्त मदत सरकारने करावी व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव लाभ मिळावा.त्यासाठी नैसर्गिक आपत्ती बाधित जिल्ह्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचा देखील समावेश करावा,अशी मागणी शिवसंग्राम संघटनेचे राजेश इंगळे,जहीर पठाण,अजमत खान, शेख राजू,शेख आदिल,नौशाद खान,साबीर खान,योगेश बन्सीले, सय्यद मोईन, असलम खान, साजिद खान,संतोष हिवाळे आदींनी केली आहे.

No comments:

Post a Comment