Tuesday, September 20, 2022

फ्ल्ड झोन मधील अनाधिकृत प्लॉट पाडून घर बांधकामावर कारवाई करा

 


शेख कदीर व प्रकाश बस्सी यांचा पालिका समोर धरणे आंदोलन सुरु

देऊळगावराजा :  अशरफ पटेल

        काही महिन्यापूर्वी शहरातील गोरगरीब व हातावर काम करणाऱ्या लोकांची अतिक्रमणे नगर परिषद मार्फत काढण्यात आले. आणि त्या बेरोजगारांना काढून त्यांना रस्त्यावर आणण्याचे काम करण्यात आले. परंतु असे असतांना  शहरातील आमना नदीच्या एफ-झोन मध्ये येत असलेल्या सर्व्हे नं. ४७/२ मध्ये  शहरातील धनदांडग्या २२ लोकांनी पाडलेले प्लॉट व ते अनाधिकृत प्लॉट पाडून निवासी घराचे बांधकाम केलेले आहे. परंतु नगर पालिका प्रशासनाच्या वतीने कोणतीच कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते शेख कदीर आणि प्रकाश बस्सी यांनी पालिका समोर धरणे आंदोलन सुरु केले आहे.   

      देऊळगावराजा शहरातील आमना नदीच्या जवळ असलेल्या ४७/२ मध्ये फ्ल्ड झोन म्हणून नोंद असतांना जागेवर अनाधिकृत प्लॉट करुन निवासी घराचे बांधकाम केलेले आहे. गेल्या तिन महिन्यापूर्वी शहरातील नगर पालिका प०शासना कडून अतिक्रमण हटविण्यात आली. त्यामुळे अनेक दुकानदार बेराजगार झाल्याचे चित्र दिसून येत आहे. या गोर गरीबांना हटविण्यासाठी पालिका प्रशासनाची वाहवाही करण्यात आली. परंतु शहरातील धनदांडग्या २२ लोकांनी फ्ल्ड झोन मधील अवैधरित्या प्लॉटची विक्री केलेली आहे. अनाधिकृत बांधकामे करण्यात आलेली आहे. परंतु पालिका प्रशासनाकडून धनदांडग्यांविरुध्द अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एकीकडे रोजीरोटी कमावणा?्या गरीबांची दुकाने तोडून त्यांना रस्त्यावर आणणे व एकीकडे धनदांडग्यांनी अनाधिकृत कृत्ये केलेले असतांनाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करणे हे दुटप्पी धोरण नगर परिषद प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. वारंवार तक्रार देवूनही कोणतीच दखल नगर पालिका प्रशासन घेत नसल्याने दि.१९ स्पटेंबर पासून स्थानिक नगर पालिका समोर शेख कदीर व प्रकाश बस्सी यांनी धरणे आंदोलन सुरु  केले आहे. दोन दिवस उलटूनही कोणतीच कारवाही होताना दिसत नाही. या धरणे आंदोलनाला शहरातील राजकीय, सामाजिक संघटनाचा पाठिंबा मिळत आहे.

No comments:

Post a Comment