Saturday, September 17, 2022

शेगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल ची बैठक संपन्न

   


 शेगाव : प्रतिनिधी  

     शेगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल चे वतीने जळगाव, बुलडाणा, अकोला जिल्हा काँग्रेस सेवादल चे पदाधिकारी यांचे उपस्थिती मधे भारत जोडो यात्रा संदर्भात बैठक झाली भारत देशाचे व काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार मा श्री राहुलजी गांधी यांचा दौरा होणार आहे त्या संदर्भात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलची बैठक शेगाव येथे संपन्न झाली.

      या वेळी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सेवादल चे सरचिटणीस तथा महाराष्ट्र चे प्रभारी  लालजी भाई मिश्रा  हे प्रमुख मार्गदर्शक होते..या वेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल चे अध्यक्ष विलासबापु औताडे यांनी राहुलजी गांधी यांचे भारत जोडो यात्रा संदर्भात विषेश व मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल चे सरचिटणीस राजेश्वर बापु देशमुख, अमरावती विभाग काँग्रेस सेवादल यंग बिग्रेड अध्यक्ष टोनु सावजी, बुलडाणा जिल्हा काँग्रेस सेवादल अध्यक्ष राजेंद्र भाऊ चव्हाण, खामगाव विधानसभा मतदार संघाचे नेते  ज्ञानेश्वर दादा पाटील, शेगाव शहर काँग्रेस चे अध्यक्ष किरण बापु देशमुख, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादल महिला प्रदेशाध्यक्षा सौ सविताताई जाधव, शेगाव महिला काँग्रेस च्या नेत्या श्रीमती सविता झाडोकर, संग्रामपुर तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष शिवकुमार गिरी, बुलडाणा जिल्हा काँग्रेस सेवादल माजी जिल्हा अध्यक्ष  शामभाऊ डाबरे, मेहकर तालुका काँग्रेस सेवादल अध्यक्ष  प्रदिप बापु देशमुख, जळगाव जिल्हा महिला काँग्रेस सेवादल अध्यक्ष  सौ ऐश्वर्या राठोड  व जळगाव, अकोला, बुलडाणा जिल्हातील काँग्रेस सेवादल चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:

Post a Comment