Saturday, September 17, 2022

कष्ट, मेहनत आणि चिकाटी या चार गोष्टी सोबत असल्या की सर्व काही शक्य होईल : मुसदवाले

 



 नीट परीक्ष यश मिळवलेल्या शिफा यांचा आमेना अजीज स्कुल येथे जाहीर सत्कार
 देऊळगावराजा :  अशरफ पटेल
        उच्च  शिक्षणासाठी कुटुंबियांचं पाठबळ हा भागही तितकाच महत्त्वाचा असतो. गरीब परिस्थितीशी लढा देत, बिकट परिस्थितीवर मात करत शिफा फिरोदोस यांनी निट परिक्षेत घवघवीत यश मिळवलंय कष्ट, मेहनत आणि चिकाटी या चार गोष्टी सोबत असल्या की सर्व काही शक्य होईल असे प्रतिपादन गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले यांनी केले. 


      स्थानिक आमेना अजिज उर्दु हायस्कुल व ज्युनियर कॉलेजच्या भव्य प्रांगणात दि.१६ स्पटेंबर रोजी नीट परीक्ष यश मिळवलेल्या शिफा फिरोदोस यांचा जाहिर सत्कार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटशिक्षण अधिकारी दादाराव मुसदवाले हे होते तर प्रमुख पाहूणे म्हणून माजी न.प.उपाध्यक्ष नासेर टेलर, सय्यद करीम, न.प.प्रशासन अधिकारी युनुस खान, मुख्यध्यापक संजय देशमुख, हाजी आलम खान कोटकर, राजेश इंगळे, जहिर खान पठाण, शेख कदीर, युसुफ खान, राजु पठाण, नईम टेलर, तय्यब टेलर, आदिल खान पठाण, रफीक नाना, शेख कदीर, हाजी इनायत खान कोटकर आदी उपस्थित होते. याप्रसंगी अल्ताफ कोटकर, प्रा. देशमुख, राजेश इंगळे, मुशीर कोटकर, युनूस खान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पुढे बोलतांना मुसदवाले म्हणाले की, तुमचे उच्च ध्येय यामध्ये समाज, जात धर्म पैसे आडवी येत नाही तर तुमचे विचार महत्वाचे असतात, जीवनात उच्च ध्येय बाळगा कारण या जगात अशक्य असे काहीच नाही,फक्त मनात जिद्द, चिकाटी आणि करून दाखवन्याची ताकत असली पाहिजे असे मत व्यक्त केले. आमेना अजीज व भास्कराव शिंगणे ए.सोसायटी देऊळगाव राजा यांच्या वतीने शिफा फिरदोस व त्यांचे वडील युनूस शेख सह परिवरांचा जाहीर सत्कार करण्यात आला. शिफा फिरदोस यांचा सत्कार श्री शिवाजी हायस्कुल, न.प.उर्दु प्रथामिक शाळा, शिवसंग्राम संघटना, पत्रकार संघच्या वतीने करण्यात आला. सिफा यांनी सत्कारला उत्तर देताना विधर्थ्याना मार्गदर्शन करताना सर्वांची मने जिंकली यावेळी शहरातील नागरिक, विद्यार्थी आणि शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शारीक सर यांनी केले तर आभार काशिफ कोटकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यश्सवेतीसाठी आमेना अजिज उर्दु हायस्कुलचे शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले. 


No comments:

Post a Comment