Thursday, September 8, 2022

शिवसंग्राम च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्योती मेटे


 शिवसंग्राम संघटना कडून जल्लोष

देऊळगाव राजा : प्रतिनिधी

    शिवसंग्राम चे संस्थापक तथा माजी आमदार विनायकराव मेटे यांचे निधनानंतर शिवसंग्रामची धुरा कोणाकडे असा प्रश्न उपस्थित झाला होता. आता यावर पडदा पडला असून स्व. मेटे यांच्या पत्नी डॉ. ज्योती मेटे यांनीच ही धुरा सांभाळली आहे. पुण्यात मंगळवारी राज्यस्तरीय बैठक झाली. यात ज्योती मेंटे यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली त्यांचे नियुक्तीनंतर  स्थानिक शिवसंग्राम संघटना कडून जल्लोष साजरा करण्यात आला.

     माजी आ. विनायक मध्ये मुंबईला जात असताना दि. १४ ऑगस्ट रोजी पहाटेच्या गाडीला अपघात झाला या त्यांचे दुर्दैवी निधन झाले मिळते यांचे राजकीय प्रवास संघर्ष मानतात त्यांनी सलग ५ वेळा विधानपरिषद सदस्य पद मिळाले होते यापुढे विनायक मेटे यांच्या मराठा आरक्षणा सह इतर स्वप्नांची कोण पूर्तता करणार शिवसंग्रामची धुरा कोण सांभाळणार असा प्रश्न निर्माण होता. परंतु राज्यातील तसेच स्थानिक शिवसंग्राम संघटनेचे पदाधिकारी राजेश इंगळे, जाहीरखान पठाण, अजमत खान पठाण व समर्थकांनी ही जबाबदारी ज्योती मेटे यांनी घ्यावी असा हट्ट धरला होता परंतु त्या प्रशासकीय अधिकारी असल्याने काही निर्णय घेतात याकडे लक्ष लागले होते. राज्य सर्वात चर्चा होत असली तरी त्यानी याबाबत काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती आखेर सोमवारी पुण्यात राजस्तरीय बैठक झाली यात सर्वनामते ज्योती मेटे यांची राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. त्यांची निवड झाल्यानंतर स्थानिक शिवसंग्राम संघटना कडून जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी शिवसंग्राम संघटनेचे तालुकाध्यक्ष राजेश इंगळे, जाहीर खान पठाण, अजमत खान पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment